महाराष्ट्रातील ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या विभागवार संघटन सचिव आणि संयुक्त संघटन सचिवपदी माध्यमकर्मींना जबाबदारी !

मुंबई : ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या राज्यातील महसूल विभागनिहाय संघटन सचिव आणि संयुक्त संघटन सचिव यांच्या निवडी संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्षा शीतल करदेकर यांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आल्या. ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’चे मुंबई विभाग संघटन सचिव सचिन चिटणीस तर संयुक्त संघटन सचिव चेतन काशीकर,अनिल चासकर,वैजंता मोरे यांना जबाबदारी देण्यात आली, तर ठाणे पालघर विभागासाठी संघटन सचिव म्हणून वैशाली आहेर प्रविण वाघमारे, कोकण विभागासाठी संयुक्त संघटन सचिव लक्ष्मीकांत घोणसे-पाटील,सुनिल कटेकर,तुषार गोसावी यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) संघटन सचिव डॉ.कादिर सोबत संयुक्त संघटन सचिव म्हणून भरत मानकर, विष्णू कदम यांना आणि नाशिक विभागासाठी संयुक्त संघटन सचिव म्हणून विठ्ठल भाडमुखे, चंद्रशेखर पाटील,अविनाश धुमाळ हे काम पहाणार आहेत. अमरावती विभागासाठी संयुक्त संघटन सचिव म्हणून राज मोहोरे आणि सुरेंद्रकुमार आकोडे काम करणार आहेत. पुणे विभागासाठीच्या संघटन सचिवपदी शेखर धोगडे आणि लक्ष्मण खटके तर संयुक्त संघटन सचिव म्हणून आदिक दिवे,भगवान परळीकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करू शकतो आणि म्हणूनच महाराष्ट्रभरातील संघटनेची भक्कम उभारणी करण्यासाठी आज सक्रिय, अभ्यासू आणि लढाऊ पत्रकारांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्षा शीतल करदेकर यांनी सांगितले.

पत्रकार आणि पत्रकारेत्तर कर्मचारी,सर्व माध्यम क्षेत्राच्या सर्व विभागातील श्रमिकांना,तसेच मालक,प्रकाशक, वितरक यांना एकाच छत्राखाली आणून, त्यांच्या सन्मान, हित आणि सन्मानार्थ काम करणारी राष्ट्रीय संघटना ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ चे पहिले अधिवेशन ‘कलागुणाची खाण असणाऱ्या करवीर नगरीत’ अर्थात कोल्हापुरात देवदिवाळी दरम्यान करण्याचा मानस सरचिटणीस डॉ. सुभाष सामंत यांनी व्यक्त केला. तसेच महिला मा ध्यमकर्मींना जबाबदारी गुणवत्तेनुसार समप्रमाणात द्यावी. जेणेकरून करुन महिलांसाठीच्या प्रश्नांना न्याय देता येईल. जिल्ह्यांची कार्यकारणी निवडल्यानंतर ,राज्याची महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल आणि देशपातळीवरील पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी हे अधिवेशनात घोषित केले जाणार आहेत, अशी माहिती संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्षा शीतल करदेकर यांनी दिली.