खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नाने फिनिक्स हॉस्पिटल जंक्शन येथील सुटली वाहतूक कोंडी…

मुंबई: बोरिवली पश्चिम चिकूवाडी येथील फिनिक्स हॉस्पिटल जंक्शनवर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने सिग्नल बसविण्यात यावेत अशी मागणी सतत स्थानिक नागरिकांकडून होत होती.बोरिवली पश्चिमच्या चिकूवाडी येथील फिनिक्स हॉस्पिटल जंक्शनवर नवीन एकूण आठ सिग्नल्स व्यवस्थेचे उद्धघाटन लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार गोपाळ शेट्टी यांनी गंभीरतेने स्थानिक रहिवाशांच्या मागणीवर लक्ष देत सात्यत्याने संबंधित विभागाला पाठपुरावा करून ही सोय उपलब्ध करून दिल्याने स्थानिक नागरिक अत्यंत समाधानी होते.

‘स्थानिक रहिवाश्यांची समस्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विविध शासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांशी समन्वय – ताळमेळ साधून काम यशस्वीपणे पूर्ण सोडवू शकलो याचे समाधान मला मोठे आहे,’ असे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुधीर सरवणकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, भाजप मुंबई सचिव युनूस खान, माजी नगरसेवक बिना दोशी, आरटीओचे अधिकारी, आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.