मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेद्वारे ‘राज्यस्तरीय लेख स्पर्धा २०२४’चे आयोजन!

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था पदव्युत्तर पदविका मराठी पत्रकारिता वर्गाच्या आणि कोकण प्रांत अखिल भारतीय साहित्य परिषद यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत मराठी भाषा दिवस आणि महिला दिनाच्या निमित्ताने ‘ राज्यस्तरीय लेख स्पर्धा ‘-२०२४ आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे विषय १)समाज माध्यमातील भाषेचा वृत्तपत्रादी प्रसार माध्यमांच्या भाषेवर – पर्यायाने दैनंदिन लिखित भाषेवरील परिणाम २) कृत्रिम बुद्धिमत्ता – भाषा व्यवहार आणि रोजगार ३) डिजिटल युगातील वाचन संस्कृती – मराठी भाषेच्या संदर्भात ४) कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना कमकुवत बनवत आहे का? ५) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला सक्षमीकरण ६) मराठी साहित्य व्यवहारात महिलांचा सहभाग आणि ७) मराठी साहित्य आणि संस्कृती यांचा अनुबंध हे आहेत

स्पर्धकांना प्रथम क्रमांक ३,००० रुपये किमतीची पुस्तके, द्वितीय क्रमांक २००० रुपये किमतीची पुस्तके आणि
तृतीय क्रमांक – १५०० रुपये किमतीची पुस्तके पारितोषिके दिली जाणार आहेत.

स्पर्धेचे नियम –
१)ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आणि निःशुल्क आहे.
२)प्रत्येक स्पर्धकाला दिलेल्या विषयांपैकी एकच विषय निवडायचा आहे.
३)शब्द मर्यादा आठशे ते एक हजार शब्द असेल.
शब्द मर्यादा पाळणे आवश्यक आहे.
४) शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
५) आपले लेख युनिकोडमध्ये टंकलिखित करून वर्ड फाईल स्वरूपात पाठवावेत.
६)लेख Pdf मध्ये पाठवू नयेत.
७)लेख स्वलिखित असावेत.
८)आपले लेख पुढील मेल आयडी वर दि. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पाठवावेत. ईमेल आयडी [email protected]
९) स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.
१०) पुरस्कार प्राप्त लेखांचा समावेश वर्गाच्या नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या लेखांत करण्यात येईल.

तज्ज्ञ परीक्षकांचा आणि आयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

स्पर्धेच्या विजेत्यांना ख्यातनाम युद्ध पत्रकार दि. वि. गोखले यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या वर्गाच्या पारितोषिक वितरण समारंभात पारितोषिक प्रदान केले जाईल. हा कार्यक्रम रविवार दिनांक २४ मार्च २०२४ला होईल.

अधिक माहितीसाठी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdAmBA_gEakPE8AG7vWFgt_K1xsO1Eo8OU7ukQ2EiYE4CKLTQ/viewform?usp=sf_link