प्ले अँड शाइन फाऊंडेशनद्वारे चॅरिटी बीच रग्बीचे आयोजन

मुंबई:प्ले आणि शाइन फाऊंडेशन आणि एलेनॉर फाऊंडेशन यांनी १९ एप्रिलला माहीम रेती बंदर बीचवर चॅरिटी बीच रग्बी स्पर्धेचे आयोजन केले होते. मुंबईत रग्बीसारख्या खेळाच्या प्रचारासाठी सामुदायिक प्रतिबद्धता आणि क्रीडावृत्तीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. तसंच पर्यावरण संवर्धनासाठी २५० हून अधिक स्वयंसेवक आणि मुलांनी सामाजिक बांधिलकी जपत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली.

चॅरिटी बीच रग्बी स्पर्धेत कोल्हापूरसह २० संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघाला चषक, ५,०००/- रुपयांचे रोख पारितोषिक आणि ब्रँड्सद्वारे प्रायोजित केलेल्या असंख्य भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (MCGM) सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (SVEEP) कार्यक्रमाद्वारे नागरिकांना लोकशाहीचे महत्त्व आणि जबाबदारीचे दायित्व सांगितले.

प्ले अँड शाइन फाउंडेशनचे अध्यक्ष सार्थक वाणी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सहभागी प्रायोजक आणि स्वयंसेवकांनी योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. वंचित मुलांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्याच्या फाऊंडेशनच्या वचनबद्धतेला त्यांनी दुजोरा देत पर्यावरणीय जबाबदारीची भावना अधोरेखित केली.