मुंबई: विश्वास, शुद्धता आणि उत्कृष्ट कारागिरीचा १९२ वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे मुंबईमध्ये आपल्या तीन नवीन भव्य दालनाचे उद्घाटन करण्यात आले. ‘पीएनजी ज्वेलर्स’चा महाराष्ट्रात आपला विस्तार वाढवणारी भांडुप, गोरेगाव आणि विरार येथील ही नवीन दालने ग्राहकांना जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देणार आहेत. या भव्य-दिव्य समारंभाकरिता बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी उपस्थित होते.
भांडुप येथील दालनाचे उद्घाटन ७ ऑक्टोबर २०२४ ला रवीना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. भांडुपच्या मध्यवर्ती भागातील हे दालन २१५० चौरस फुटांच्या जागेत विस्तारलेले असून ग्राहकांना खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करते. या दालनात सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनम दागिन्यांचे निवडक कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे. या दालनामध्ये नववधूच्या दागिन्यांपासून ते रोज परिधान करता येणाऱ्या हलक्या वजनाच्या दागिन्यांपर्यंत अनेक आकर्षक कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहेत.
८ ऑक्टोबर २०२४ ला गोरेगाव येथील दालनाचे उदघाटन रवीना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाढत्या महानगरीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे दालन सुरू करण्यात आले आहे. ३१८१ चौरस फूट जागेत विस्तारलेले हे दालन दागिन्यांची विस्तृत श्रेणी प्रदान करते जी ‘पीएनजी ज्वेलर्स’ची गुणवत्ता आणि परंपरेबद्दलचे समर्पण प्रतिबिंबित करते. आधुनिक आणि पारंपरिक सौंदर्याचा मिलाफ असलेल्या विविध प्रकारच्या डिझाईन्स ग्राहकांना येथे अनुभवता येणार आहे.
९ ऑक्टोबर २०२४ ला स्वप्नील जोशी यांच्या हस्ते विरार येथील दालनाचे उदघाटन करण्यात आले. हे दालन ४८०० चौरस फुटांच्या जागेत विस्तारलेले आहे. हे दालन विरारमधील वाढत्या समुदायाला सेवा देण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि या दालनात सोने, प्लॅटिनम आणि चांदीमधील नववधूचे दागिने, अंगठ्या, ब्रेसलेट इत्यादींचा समावेश असणार आहे. या परिसरातील दागिने प्रेमींसाठी हे पसंतीचे ठिकाण बनेल यात शंका नाही.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘मुंबई ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ असून या तीन नवीन दालनांसह गुणवत्ता, विश्वासार्हता आणि उत्तम कलाकुसरीचा वारसा शहरातील अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याची आमची वचनबद्धता दर्शविते. मुंबई आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये (एमएमआर) आता एकूण १० दालने असून शहरातील जवळजवळ सर्व भागांपर्यंत आणि अधिक ग्राहक वर्गापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. हा महत्त्वाचा टप्पा अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या सोबत साजरा करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. मुंबईतील ग्राहकांना उत्कृष्ट दागिने आणि अतुलनीय ग्राहक अनुभव सेवा देण्यास आम्ही उत्सुक आहोत.’
भांडुप आणि गोरेगाव येथील दालनाचे उद्घाटन करताना अभिनेत्री रवीना टंडन म्हणाल्या की, ‘पीएनजीच्या विस्तार प्रवासाचा भाग होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. दागिने हे आपल्या संस्कृतीमधील अविभाज्य भाग असून ‘पीएनजी ज्वेलर्स’ने परंपरा आणि आधुनिक अभिजाततेचा मिलाफ करत आपले उत्कृष्ट कार्य सुरू ठेवले आहे. भांडुप आणि गोरेगाव येथे उपलब्ध असलेले आकर्षक कलेक्शन ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी मला खात्री आहे.’
विरार येथील दालनाचे उद्घाटन करताना स्वप्नील जोशी म्हणाले की, ‘परंपरा, वारसा तसेच अस्सल आणि आकर्षक डिझाइन्ससाठी ओळखला जाणारा पीएनजी ज्वेलर्स हा ब्रँड नेहमीच माझ्या पसंतीचा राहिला आहे. विरारच्या नवीन दालनाच्या उद्घाटनाचा भाग होणे माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. मला खात्री आहे की, दागिने प्रेमींसाठी हे पसंतीचे ठिकाण बनेल.’
या दालनाच्या उद्घाटनाचा एक भाग म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’ मुंबईमधील आपल्या ग्राहकांना खास ऑफर देत आहे. ७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. नवरात्र सुरू होत असतानाच या ऑफरमुळे ग्राहकांना अनोख्या किमतीत आपल्या पसंतीचे व आलिशान दागिने खरेदी करता येणार आहेत.
या तीन नवीन दालनांसह मुंबईमधील आघाडीचे ज्वेलर म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’ने आपले स्थान भक्कम केले आहे. प्रत्येक दालन हे ग्राहकांना सर्व प्रकारच्या समारंभांसाठी विस्तृत श्रेणी तसेच ग्राहकांना ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ओळख असलेली उच्च गुणवत्ता आणि कलाकुसर प्रदान करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे.