प्रॉपचेकचा आयआयटी रूरकीसोबत सहयोग

मुंबई : प्रॉपचेक या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञान-सक्षम होम इन्स्पेक्शन स्टार्टअपने देशातील होम इन्स्पेक्शन्सचे सत्यापन करण्याच्या उद्देशाने उद्योग बेंचमार्क्स स्थापित करण्याकरिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) रूरकीसोबत अद्वितीय सहयोग केला आहे. हा महत्त्वपूर्ण सहयोग भारतीय रिअल इस्टेट उद्योगातील प्रमाणित मार्गदर्शकतत्त्वांमधील मर्यादांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, तसेच सर्वसमावेशक प्रोटोकॉल्सच्या माध्यमातून मालमत्तांची सुरक्षितता आणि दर्जाची हमी देतो.

कंत्राटदार, विकासक, बांधकाम व्यावसायिक आणि अंतिम ग्राहकांसाठी उद्योग मानक सुस्थापित असलेल्या पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात अशा नियमांच्या कमतरतेमुळे मालमत्तांच्या सुरक्षितता आणि बांधकाम नियमांचे पालन तपासण्याबाबत नकारात्मक भावना दिसून येते. ही महत्त्वाची तफावत ओळखून प्रॉपचेक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी यांचा मालमत्तांच्या बांधकाम दर्जाचे मूल्यमापन करण्यासाठी मजबूत पाया विकसित करून या समस्येचे निराकरण करण्याचा मनसुबा आहे.

प्रॉपचेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक सौरभ त्यागी म्हणाले, ‘आयआयटी रूरकीसोबतचा आमचा सहयोग रिअल इस्टेट क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीचे प्रतिनिधीत्व करतो. आमचा सर्वोच्च शैक्षणिक संस्थेसोबत सहयोग करण्याचा मनसुबा होता आणि आयआयटी रूरकीचा प्रतिष्ठित सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग या नाविन्यपूर्ण उद्यमासाठी स्वाभाविक निवड होती. या अद्वितीय सहयोगामधून सर्वोत्तमतेप्रती आमची अविरत कटिबद्धता आणि होम इन्स्पेक्शन क्षेत्रात प्रमाणीकृत प्रोटोकॉल्स स्थापित करण्याप्रती आमचा निर्धार दिसून येतो. हे प्रोटोकॉल्स सर्व भागधारकांसाठी विश्वसनीय बेंचमार्क म्हणून सेवा देतील, तसेच भारतभरातील मालमत्तांची सुरक्षितता आणि दर्जाची हमी देतील. हा महत्त्वपूर्ण टप्पा देशभरातील होम इंटीरिअर्सचे मानक सुधारण्याच्या दिशेने लक्षणीय प्रयत्न आहे, जो होम इन्स्पेक्शन उद्योगामध्ये सुधारणा करण्यासाठी आमचे नेतृत्व आणि सातत्यपूर्ण प्रयत्नां शी संलग्न आहे. आमचे नाविन्यता व विचारशील नेतृत्वासंदर्भात अग्रस्थानी राहण्याची खात्री घेत भारतीय बांधकाम क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे ध्येय आहे.’

आयआयटी रूरकीचे डॉ. भूपिंदर सिंग म्हणाले, ‘प्रॉपचेकने हाती घेतलेला उपक्रम भारताच्या बांधकाम उद्योगाच्या सर्वोत्तम हितासाठी आहे. देशातील सिव्हिल इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चरसाठी अग्रणी शैक्षणिक संस्था आयआयटी रूरकीला या मोठ्या प्रयत्नामध्ये प्रॉपचेकला पाठिंबा देणे बंधनकारक वाटले. आम्ही भारतीय बांधकाम उद्योगासाठी मालमत्ता तपासणी प्रक्रिया प्रमाणित करण्याकरिता आमच्या क्षमतेनुसार जे काही करू शकतो ते करत आहोत. उद्योग आणि शैक्षणिक संस्थामधील अशाप्रकारचे सहयोग उत्तम परिणाम देतील.’