पुणे : गुरुशिष्यानी गुरूपौर्णिमेला एकमेकांना एकत्र नाट्यलेखनाची अनोखी भेट दिली. गुरूस्कूल गुफानमधे गुरूवर्य प्रा. देवदत्त पाठक यांना नाट्य सेवा माध्यमातून गुरुवंदना देण्यात आली. सर्व शिष्यांनी मिळुन गुरू देवदत्त पाठक आणि शिष्य सुमित दांगट यांनी लिहिलेले ‘देवमित’ हे नाटय काव्य देवदत्त प्रकाशनाद्वारे प्रकाशित केले.
यावेळी शिष्यांनी केलेल्या बारखडीतून केलेल्या कवितांचे वाचन आराध्या करपे,साजिरी नगरकर (छोटे) सायली चव्हाण (कुमार) कुलदीप पाटील, आयुष सावंत, श्रेयश झपाटे(युवा) यांनी केले, तर अक्षता जोगदनकर, ऋतुजा उत्तेकर, धनश्री गवस , यांनी देव मानणारे, न मानणारे आणि संभ्रमात असणारे या विषयावरचे देवदत्त पाठक लिखित आणि मिलिंद केळकर दिग्दर्शित नाटक सादर केले.सर्व शिष्यांची मिळून आपल्या गुरूला ही अनोखी भेट आणि नाट्य सेवा दिली आहे अशी भावना सर्वांच्या वतीने शिवम बाक्रे , प्रशांत चौधरी, आलोक जोगदनकर, तनया जाधव, प्रविण मोटेगांवकर यांनी व्यक्त केली.
यावेळी सलग मोफत २१ कार्यशाळा गावोगावी जाऊन घेतल्याबद्दल देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांचा तर , लेखनमित शिष्य म्हणून सुमित दांगट यांचा सन्मान करण्यात आला.प्रत्येक शिष्याच्या नाट्य कला प्रगतीसाठी हटके विषयावर कथा, कविता, कल्पना स्फुट, नाटक आणि नाट्य काव्य मी स्वतः एकत्र लिहून प्रकाशित करुन त्याचे नाट्य प्रयोगही करत राहणार असे प्रा. देवदत्त पाठक यांनी सांगितले. यावेळी सर्व समाज सेवक डॉ. नितिन जाधव, सीमा जोगदनकर, उषा देशपांडे, शिव राहणे उपस्थित होते.