कोटक सिक्युरिटीजतर्फे २०२५ साठी अहवाल प्रसिध्द

मुंबई: कोटक सिक्युरिटीज लिमिटेडने २०२५ मध्ये शेअरबाजाराची वाटचाल कशी राहील, याबाबत आपला मार्केट आउटलुक अहवाल आज प्रसिद्ध केला. कोटक सिक्युरिटीजने या अहवालात समभाग, कमोडीटी आणि चलन बाजाराच्या संभाव्य वाटचालीसह ढोब‌ळ अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनावर प्रकाशझोत टाकला आहे. या अहवालामुळे गुंतवणूकदार आगामी वर्षात या घटकांच्या वाटचालीवर आपले लक्ष ठेवू शकणार आहेत.

कोटक सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाल शाह अहवालाच्या प्रकाशनप्रसंगी म्हणाले, ‘जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताने आपले स्थान कायम राखले आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारत हा एक आकर्षक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास आले आहे. दीर्घकाळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृध्दीच्या क्षमतेवर आम्हाला ठाम विश्वास असला तरी गुंतवणूकदारांनी बाजाराबाबत आशावाद कायम ठेवताना सावधानता बाळगण्याचा सल्ला आम्ही देतो. शेअर बाजाराला अधिक गती मिळेल आणि २०२५ मध्ये कमोडिटी (वस्तू) त्यांच्या ऐतिहासिक पातळीच्याही पुढे जातील, असा आमचा अंदाज आहे. याचबरोबर लवकरात लवकर संपत्ती निर्मितीच्या उद्देशाने शेअर बाजारात उतरणाऱ्या तरुण गुंतवणूकदारांची होत असलेली वाढ एकूण बाजाराच्या वृध्दीला आणखी हातभार लावताना दिसणार आहे.’

अहवाल सविस्तर वाचण्यासाठी https://www.kotaksecurities.com/uploads/K_Sec_Market_Outlook_2025_f42d0c98c5.pdf या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *