‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे उत्सवकाळानिमित्त ‘सप्तम कलेक्शन’

मुंबई:समृद्ध परंपरा असलेल्या आणि ग्राहकांप्रति विश्वासार्ह असलेल्या प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे उत्सवकाळानिमित्त ‘सप्तम कलेक्शन’ मधील नवीन डिझाईन्स सादर करण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे दागिन्यांमधील उत्कृष्टतेच्या वारशासह ‘पीएनजी ज्वेलर्स’ने कलाकुसर व अभिनवता याबाबत आपली कटिबद्धता कायम ठेवत सणासुदीच्या काळासाठी दागिन्यांची विस्तृत श्रेणी सादर केली आहे.

‘सप्तम’ कलेक्शन’ने सुरुवातीपासूनच ग्राहकांची पसंती मिळवली आहे. या कलेक्शनमधील उत्कृष्ट कलाकुसर व कालातीत डिझाईन्सचे ग्राहकांनी कौतुक केले आहे. दिवाळी २०२३ यामध्ये मिळालेल्या यशानंतर उत्सवकाळानिमित्त पुन्हा एकदा ‘पीएनजी ज्वेलर्स’ला ‘सप्तम कलेक्शन’मधील नवीन दागिन्यांची श्रेणी सादर करताना आनंद होत आहे. या कलेक्शनमध्ये कुंदन, जडाऊ, हिरे व पारंपरिक सोन्यामध्ये तयार करण्यात आलेले हार, कानातले, अंगठी, ब्रेसलेट इत्यादी उत्कृष्ट दागिन्यांची विस्तृत श्रेणी पाहायला मिळणार आहे.

नवीन ‘सप्तम कलेक्शन’विषयी माहिती देताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘नवीन ‘सप्तम कलेक्शन’ हे एकता, प्रेम, उत्सवाची भावना, समृद्धी, नवी सुरुवात, उत्साह व सौंदर्यतेचे प्रतिबिंब आहे, जे या मूळ संकल्पनेवर आधारित आहे. यंदाच्या उत्सवकाळासाठी आमच्या ग्राहकांना त्यांची आवडती शैली व पसंतीनुसार दागिने खरेदीचा अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत.’

हे कलेक्शन ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या भारतभरातील सर्व दालनांमध्ये १५ मे २०२४ पर्यंत उपलब्ध असेल. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्क्यांपर्यंत सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर फ्लॅट ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या एक्सचेंजवर शून्य टक्के घट मिळणार आहे. या ऑफर्सद्वारे ग्राहकांना योग्य दरात उत्कृष्ट दागिने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.