एसएलसीएमने ४२ टक्के महसूल वाढीची नोंद केली

मुंबई: बहुराष्ट्रीय पोस्ट-हार्वेस्ट अ‍ॅग्री-लॉजिस्टिक्स कॉर्पोरेशन एसएलसीएमने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी अपवादात्मक आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे. १,७२० कोटी रूपयांवरून २,४४८ कोटी रूपयांपर्यंत कंपनीच्या सकल (एकूण) उत्पन्नामध्ये प्रभावी ४२ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये उल्लेखनीय ४०५ टक्क्यांची वाढ आणि पीबीटीमध्ये २१६ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली. या प्रभावी यशामुळे कंपनी आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरीस आणखी ३०० टक्के वाढ करण्यास, तसेच १७ कोटी रूपयांचा अपेक्षित नफा संपादित करण्यास सज्ज आहे.

एसएलसीएमचे ग्रुप सीईओ संदीप सभरवाल म्हणाले, ‘अनपेक्षित वाढीमधून एसएलसीएमची जोखीम व्यवस्थापनाला पुनर्परिभाषित करण्याप्रती आणि कृषी क्षेत्रात कर्ज देण्याप्रती स्थिर कटिबद्धता दिसून येते. आम्ही शेतकऱ्यांसाठी आणि इतर भागधारकांसाठी अत्याधुनिक सोल्यूशन्स विकसित आणि वितरित करण्याप्रती समर्पित राहू, ज्यामुळे त्यांची दैनंदिन कामे सुलभ होण्यासोबत त्यांना गती मिळेल, तसेच त्यांना विस्तार करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान साधने प्रदान करता येतील.’

कृषी व्यवसायांना सोल्यूशन्स आणि क्षमता देणाऱ्या कंपनीच्या वैविध्यपूर्ण क्षेत्रांनी याप्रती योगदान दिले आहे. किसानधन एसएलसीएमच्या डब्ल्यूओएसने प्रत्येक सरत्या दिवसासह एनबीएफसी क्षेत्रांतर्गत उद्योगासाठी नवीन मानक स्थापित केले आहेत. अनेक औद्योगिक प्रथम कामगिरींपैकी एक म्हणजे २०,००० हून अधिक महिला उद्योजकांना ८७ कोटी रूपयांचे कर्ज, जे लैंगिक समानतेच्या दिशेने मोठे पाऊल आहे. शेतकऱ्यांच्या सुधारणेकडे ग्रुपने बहुतांश लक्ष केंद्रित केले आहे, जे त्यांच्या कार्यसंचालनांना चालना देत आणि १३ हून अधिक राज्यांमध्ये एफपीओंची संख्या वाढवण्याच्या माध्यमातून त्यांच्या सेवा क्षेत्रामध्ये वाढ करत संपादित करण्यात आले आहे. यामुळे ६०,००० शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला आहे.

ग्रुपची आपल्या उल्लेखनीय पेटण्टेड प्रोसेस मॅनेजेमेंट सिस्टम, अ‍ॅग्री रिचच्या माध्यमातून उच्च दर्जाचे जोखीम व्यवस्थापन सोल्यूशन्स प्रदान करण्याप्रती अविरत कटिबद्धता या मोठ्या विकासासाठी जबाबदार आहे. अ‍ॅग्री रिचचे नवीन सादर करण्यात आलेले आणि एआय क्वॉलिटी चेक ऑक्टोबर २०२२ मध्ये लाँच करण्यात आले होते, ज्याने अल्पावधीत ३.४४ दशलक्ष मेट्रिक टन व्यापून घेत ८०,००० हून अधिक अद्वितीय तपासणींसह ७० हून अधिक वस्तूंच्या क्वॉलिटीचे मूल्यांकन केले आहे. या अ‍ॅपने पीक निर्मिती करत कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. निष्ठेबाबत कोणतीही चिंता न करता क्वॉलिटी रिपोर्ट्स १५ सेकंदांमध्ये शेतकऱ्यांना सुलभपणे निर्णय घेण्यास मदत करतात.