मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिव्यांग आणि विशेष मुलांच्या उपस्थितीत साजरा केला वाढदिवस !

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग आणि विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खाऊ आणि वह्या वाटप करण्यात आले. तसेच टेंभीनाका येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगाना विविध साहित्यांचे वाटप केले.

स्वयंम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावून दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. विशेष मुलांच्या हातून केक कापण्यात आला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयंम अँपचे अनावरण, स्वयंमच्या झेप या स्मरणिकेचे आणि संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयंम अँपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगासाठी भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाची पाहणीही केली. यावेळी स्वयंमच्या संस्थापक डॉ. निता देवळालकर उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघातील किसन नगर येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विभागातील मुलांना शालेय वह्या आणि खाऊचे वाटप केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे उपस्थित होत्या. यावेळी येथील भित्तीचित्राचे अनावरणही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

आनंद आश्रमात नागरिकांच्या शुभेच्छांचा केला स्विकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त आनंद आश्रमात धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले. यावेळी सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी mनरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी आनंदआश्रमाच्या बाहेर मोठ्या संख्येने नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांची भेट घेत शुभेच्छांचा स्विकार केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.

दिव्यांगांना साहित्याचे वाटप

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने टेंभी नाका येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल, कुबड्या, कानाचे यंत्र, व्हीलचेयर या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्यदूत पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.