महिलांच्या आरोग्यसेवेत फेमटेक घडवत आहे क्रांतिकारी बदल – एस. गणेश प्रसाद

वर्ष २०२१च्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास पन्नास टक्के व्यक्ती महिला आहेत, ज्या घरगुती खरेदी निर्णय व जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. असे असले तरी त्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये डॉक्टरांकडे जातात. डॉक्टरांकडे गेले तरी बहुतांश महिला आजार पूर्णपणे बरे होण्यासाठी महत्त्वाचे असलेल्या फॉलो-अप भेटी किंवा चाचण्यांसाठी क्वचितच जातात. त्या फक्त औषधे घेतात, लक्षणे कमी होण्याची वाट पाहतात आणि दीर्घकालीन उपायाकडे न पाहता कामावर परतात. हे धोकादायक ठरू शकते, कारण आजार पुन्हा होऊ शकतो किंवा अधिक गंभीर होऊ शकतो आणि याच कारणामुळे स्थितीमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

भारतीय बाजारपेठेत फेमटेक उत्पादनांच्या श्रेणी सादर केल्याबद्दल धन्यवाद, महिला आता त्यांच्या घरामध्ये आरामशीरपणे समस्या ओळखू शकतात आणि त्यावर उपचार देखील करू शकतात. प्रजनन प्रणाली, प्रजनन क्षमता, स्त्रीबिजांचा चक्र, रजोनिवृत्ती आणि जीवनशैलीच्या समस्यांशी संबंधित महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणारे सॉफ्टवेअर आणि डायग्नोस्टिक्सच्या श्रेणीत उत्पादने येतात. टेलिहेल्थ व ऑनलाइन सल्लामसलत यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विशेषत: तज्ज्ञ डॉक्टर सहज उपलब्ध नसलेल्या केसेसमध्ये उपचार केले जाऊ शकतात.

आरोग्यविषयक समस्यांसंदर्भात प्रजनन प्रणालीवर परिणाम करणारे आजार महिलांमध्ये विशेषत: बाळंतपणाच्या वयात तुलनेने सामान्य आहेत. तरीही, निदान किंवा उपचार करण्यासाठी काही महिलाच पुढाकार घेतात, कारण पारंपारिक प्रक्रिया खूप वेदनादायक, लांबलचक आणि कधी-कधी जटिल देखील असू शकतात. उदाहरणार्थ, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स हे जगभरातील महिलांवर परिणाम करणा-या सर्वात सामान्य सौम्य ट्यूमरपैकी एक आहे, कधी-कधी रुग्णाच्या वयानुसार ८० टक्यांयू पर्यंत हा ट्यूमर असतो. बरेच स्त्रीरोगतज्ञ सध्या ब्लाइण्ड डीअॅण्डसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरातन, १७५ वर्ष जुन्या वैद्यकीय प्रक्रियेवर अवलंबून आहेत. या प्रक्रियेमुळे रूग्णाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, कारण ही प्रक्रिया प्रत्यमक्ष दृश्य उपलब्धतेच्या अभावामुळे शरीरातील फायब्रॉइड्स शोधण्यात अयशस्वी ठरते. येथेच एमएचटीआर (मेकॅनिक हिस्टेरोस्कोपिक टिश्यू रिमूव्हल) सिस्टिम्स सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान गेम चेंजर ठरू शकतात. हे सर्जन्सना ९८ टक्के रोगग्रस्त उती काढून टाकण्याव्यतिरिक्त एकाच सेटिंगमध्ये पाहण्यास आणि उपचार करण्यास सक्षम करते. खरेतर, ८० टक्क्यांहून अधिक केसेसमध्ये कमीत-कमी वेदनेसह भूल न देता उपचार केले जाऊ शकतात.

आणखी एक क्षेत्र जेथे फेमटेक मदत करत आहे ते म्हणजे स्तनापासून गर्भाशयापर्यंत कर्करोगाची तपासणी आणि उपचार. स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत मृत्यूचे एक प्रमुख कारण म्हणजे उशीरा निदान. मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी यांसारख्या विद्यमान पद्धती मुख्यतः ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांसाठी केल्या जातात. भारतामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असलेल्या महिलांच्या तरुण वर्गाचा यामध्ये समावेश नाही. लवकर निदान झाल्यास अगदी कोणतीही लक्षणे न दिसणा-या महिलांसाठी हे नवीन तंत्रज्ञान अनमोल ठरू शकते. स्तनांमधील थर्मल बदल शोधण्याची या तंत्रज्ञानाची अद्वितीय क्षमता आहे. वापरलेले तंत्र लिक्विड क्रिस्टल थर्मोग्राफी आहे, जे ट्यूमरचा विकास वाढत्या कर्करोगाच्या क्षेत्रामध्ये उच्च तापमानाशी संबंधित असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे.

महिलांना गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगापेक्षा स्तनाच्या कर्करोगाविषयी अधिक माहित आहे, ही आणखी एक मोठी आरोग्य समस्या आहे, जी टाळता येऊ शकते. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगास कारणीभूत असलेले विषाणू – एचपीव्ही १६ आणि एचपीव्ही १८ दीर्घकाळ इन्क्यूबेशन करतात. १५ ते २५ वर्षे वयोगटातील महिलांचे लसीकरण गुणकारी आहे. पण २५ वर्षांवरील महिलांसाठी या प्रकारच्या कर्करोगाची तपासणी आणि उपचार करण्यासाठी उपकरणे आवश्यक आहेत. नवीन तंत्रज्ञान-आधारित, एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सक्षम उपकरणे आणि बॅटरीवर चालणारे उपकरण यांचे संयोजन खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. एआय-सक्षम उपकरणे गर्भाशय ग्रीवाचे स्पष्ट व्हिज्युअल नॉन-इनवेसिव्ह पद्धतीने देऊ शकतात, तर बॅटरीवर चालणाऱ्या उपकरणामध्ये व्हिज्युअलच्या आधारे प्रीकॅन्सरेस लेशन्स काढून टाकण्याची क्षमता असते.

फेमटेक हे एकाच वेळी चाचणी व उपचार करण्याबाबत आहे, ज्यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची कोणतीही सबब राहणार नाही. महिलांची ओरल स्क्रिनिंग आणि जीवनशैलीच्या समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम असणारी उपकरणे देखील पाइपलाइनमध्ये आहेत. पण भविष्य वेअरेबल्सचे आहे. महिला लवकरच त्यांच्या शरीरातील बदल ओळखू शकतील आणि त्यांच्या फोनवर आरोग्यविषयक सूचना प्राप्त करू शकतील असे ड्रेसेस घालण्यास सक्षम होतील. फेमटेकमध्ये आज जे दिसत आहे ती फक्त एका क्रांतीची सुरुवात आहे, जी महिलांच्या आरोग्यामध्ये परिवर्तन घडवून आणेल.

– एस. गणेश प्रसाद
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
जेनवर्क्स