मुंबई: विद्या विकास मंडळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवकाशाची भटकंती केली. ‘भटकंती अवकाशाची’ हे
खगोलीय प्रश्नांना उत्तरे देणारे फिरते तारांगण विद्यार्थ्यांनी पाहिले. मुलांना अंतरिक्षाबद्दल वाटणारे कुतुहल व जिज्ञासा यांना चालना देणारा हा अतिशय सुंदर उपक्रम आहे. शिशुवर्गापासून ते इयत्ता ९वी पर्यंतच्या ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या फिरत्या आभासी तारांगणाचा अनुभव घेतला.
विद्या विकास मंडळ शाळेत शालान्त परीक्षा वर्ष २००० च्या वर्गाने फिरते तारांगण हा उपक्रम प्रत्यक्षात आणला.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळेच्या कार्यकारिणीचे तसेच अंजनेय टीमचे विशेष सहकार्य लाभले.