स्विस ब्‍युटीकडून द लिपस्टिक ऑफ इंडिया लाँच

मुंबई: लोकप्रिय भारतीय कॉस्‍मेटिक्‍स ब्रॅण्‍ड स्विस ब्‍युटीने नुकतेच द लिपस्टिक ऑफ इंडिया – होल्‍ड मी मॅट लिक्विड लिपस्टिक लाँच केली आहे. भारतीय स्किनसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही मेड इन इंडिया लिपस्टिक अनेक अद्वितीय वैशिष्‍ट्ये आणि मूल्‍यासह लिपस्टिक मानकांना नव्‍या उंचीवर नेते.

नॉन-ड्राईंग मॅट फिनिश, व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅप्रीकोट ऑईलसह उत्तम हायड्रेशन आणि भारतातील वातावरणामध्‍ये १२ तासांपर्यंत टिकून राहणारी ‘द लिपस्टिक ऑफ इंडिया’ ३० आकर्षक शेड्समध्‍ये येते. या लिपस्टिकचे लक्‍झरीअस टेक्‍स्‍चर दिवसभर मॅट फिनिश टिकून राहण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहे. याव्‍यतिरिक्‍त उत्‍पादनाची डर्माटोलॉजिकली चाचणी करण्‍यात आली आहे आणि ब्रॅण्‍ड पेटा सर्टिफाईड अ‍ॅनिमल टेस्‍ट-फ्री आहे, ज्‍यामुळे होल्‍ड मी मॅट लिपस्टिक सुरक्षिततेची खात्री देते. या लिपस्टिकची किंमत फक्‍त ४२९/- रूपये आहे. नवीन लाँच करण्‍यात आलेली लि‍पस्टिक श्रेणी सर्वोत्तम असण्‍यासह सौंदर्यप्रेमींसाठी किफायतशीर आहे.

लिपस्टिक श्रेणी स्विस ब्‍युटीची ऑफिशियल वेबसाइट, नायका, अ‍ॅमेझॉन, पर्पल, मिंत्रा आणि इतर अनेक मार्केटप्लेसेसवर उपलब्‍ध आहे. ब्रॅण्‍डचे बीएफएफ सेलिब्रेशन्स मॉल, उदयपूर आणि एलाण्‍टे मॉल चंदिगड येथील ब्रॅण्‍डच्‍या ईबीओंमध्‍ये, तसेच भारतातील दहा शहरांमधील रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उत्‍पादन खरेदी करू शकतात. ब्रॅण्‍ड लवकरच इतर मार्केटप्‍लेसेस व भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये उत्‍पादनाचा विस्‍तार करणार आहे.

स्विस ब्‍युटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) साहिल नायर म्‍हणाले, ‘आम्‍हाला वर्षातील आमची सर्वोत्तम ‘होल्‍ड मी मॅटे’ लिपस्टिक श्रेणी लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या क्रांतिकारी कलेक्‍शनमधून भारतीय मेकअपप्रेमींसाठी क्‍यूरेट करण्‍यात आलेली आणि त्‍यांच्‍या गरजांची पूर्तता करणारी उत्‍पादने सादर करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. ही ‘द लि‍पस्टिक ऑफ इंडिया’ आहे, कारण भारतीयांच्‍या त्वचेचे रंग, आवडी, नापसंती, विविध हवामान परिस्थिती, हायड्रेशन, पेऑफ आणि भारतीय मेकअप प्रेमींना खरोखर काय हवे आहे याबाबत संशोधन करून उत्पादनाची संकल्पना करण्यात आली. ३० आकर्षक शेड्स, दीर्घकाळापर्यंत राहणारे मॅट फिनिश आणि प्रखर हायड्रेशनसह ‘होल्‍ड मी मॅट’ सर्वोत्तम लिपस्टिक आहे. ही लिपस्टिक भारतीयांमध्‍ये सामर्थ्य आणि आत्‍मविश्‍वास निर्माण करते. आम्‍ही ही लिपस्टिक विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्‍टोअर्समध्‍ये लाँच केली आहेत, तसेच आमचा विश्‍वास आहे की ही लिपस्टिक श्रेणी सर्व मेकअपप्रेमींसाठी आकर्षक सौंदर्याचे प्रतीक बनेल.’