स्विस ब्युटीची तापसी पन्नूसोबत नवी मोहीम

मुंबई: स्विस ब्युटी या २०१३ साली सुरू झालेल्या लोकप्रिय भारतीय कलर कॉस्मॅटिक ब्रॅण्डने अलीकडेच आपली ‘फॉर ऑल दॅट यू आर, फॉर ऑल दॅट यू कॅन बी’ ही उत्कंठा वाढविणारी आणि नवी संकल्पना मांडणारी जाहिरात प्रसिद्ध केली. व्यक्तीच्या न थांबणाऱ्या, आगळ्यावेगळ्या आणि बेधडकपणे व्यक्त होणाऱ्या व्यक्तिमत्वाचे मूर्त रूप असलेली लक्षणीय अभिनेत्री आणि ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर तापसी पन्नू या जाहिरातीमध्ये झळकत आहे. चाकोरीशी जुळवून घेणाऱ्या या जगामध्ये या ब्रॅण्डने सर्व चौकटी मोडण्याचे आणि आपल्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आत असलेल्या अस्सल, सहजसाध्या सौंदर्याला मुक्त करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.

तापसीने आपल्या इन्स्टाग्रॅमवर ‘तापसी व्हर्सेस द वर्ल्ड’ हा टीझर शेअर करून या जाहिरात मोहिमेची सुरुवात केली. हा टीझर सोशल मीडियावर वेगाने प्रसिद्ध झाला आणि त्याने मनोरंजन विश्वात एकच खळबळ माजवून दिली. अवघ्या ५ तासांमध्ये ‘तापसी व्हर्सेस द वर्ल्ड’ हा ट्विटरवरचा टॉप ट्रेण्डिंग हॅशटॅग बनला आणि त्याला १४.७ दशलक्ष इम्प्रेशन्स मिळाली. इन्स्टाग्रामवर हा टीझर क्षणात चर्चेचा आणि स्विस ब्युटीसाठी ५४.१ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या तापसी पन्नूच्या मनात नेमके काय आहे असा प्रश्न अनेक उल्लेखनीय बॉलिवूड पॅप्स आणि मनोरंजन वाहिन्यांना पडला.

स्विस ब्युटीचे सीईओ साहिल नायर म्हणाले, ‘सबलीकरण, अभिव्यक्ती आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व साजरे करण्यावर आमचा विश्वास आहे. या जाहिरात मोहिमेच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक व्यक्तीला आपल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिमत्त्वाला स्वीकारण्याची, स्वत:च्या आगळ्यावेगळ्या सौंदर्याला न घाबरता व्यक्त करण्याची आणि आत्मविश्वासाने स्वत:च्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा द्यायची आहे. स्विस ब्युटी हा केवळ एक मेकअप ब्रॅण्ड नाही तर सबलीकरण आणि स्व-शोधासाठीचा एक मंच आहे. तापसीच्या साथीने हा प्रवास सुरू करण्यास आणि व्यक्तींना आज ते जसे आहेत तसे असण्यासाठी आणि उद्या त्यांना हवे ते बनण्यासाठीचे बळ देण्यास आम्ही उत्सुक आहोत.’

तापसी पन्नू म्हणाली, ‘ज्या ब्रॅण्डकडे सांगण्यासारखी काहीतरी गोष्ट असते ते ब्रॅण्ड मला महत्त्वाचे वाटतात. स्विस ब्युटीकडे अशी गोष्टी आणि इतरही बरेच काही आहे. विसंबून राहण्याजोगी, सोयीची आणि तरीही उत्तम कामगिरी देणारी सौंदर्य प्रसाधने बनविण्याचे अतिशय भक्कम लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून हा ब्रॅण्ड अगदी छोट्या स्तरापासून वर आला आहे. आपल्या किंमतीहून अधिक काही देऊ करणारी उत्पादने मला नेहमीच आकर्षित करतात आणि स्विस ब्युटीने हे तत्व खऱ्या अर्थाने वास्तवात आणले आहे. त्यांच्या मेकअपच्या श्रेणीमध्ये निवडीसाठी अनेक पर्याय आहेत आणि तरुणाईची व जवळ-जवळ प्रत्येकाचे म्हणणे मांडणारा आवाज आहे.’