जगातील सर्व कलांचा एकच समान धागा सकारात्मक संवेदना निर्माण करणे – प्रा. देवदत्त पाठक

पुणे:जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने गुरुस्कूल गुफान संस्थेच्या वतीने २७ मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने जॉन फोसे नॉर्वेयन नाटककार, साहित्यिक नोबेल पारितोषिक विजेते आणि अनेक पद्य नाटकांचे लेखक यांनी सर्व जगाला नाट्य संदेश दिला. वर्ल्ड थिएटर ऑर्गनायझेशन यांनी यावर्षी त्यांना नाट्य संदेश देण्यासाठी सन्मानित केले आहे. त्यांनी कला म्हणजे शांत संयमित अनेक भावनांना व्यक्त करण्याचे उत्तम साधन आहे , असे मत मांडले. या नाट्यसंदेशाचा आधार घेत सर्वांना एक परिपक्व अनुभव गुफान गुरुकुल फाउंडेशनच्या कलाकारांनी दिला.

गुफानने सादर केलेल्या तीन कल्पना स्फूट हल्ला,धुंद फुंद आणि खालचे नी वरचे या छोट्या गोष्टीचे सादरीकरण,पहिली ते चौथी या नाटकातून कवितांचे प्रकटीकरण तर महिला दिन साजरा हे नाटक, या तीन वेगवेगळ्या कलात्मक प्रयोग कृतीतून एक वेगळाच सकारात्मक अभिरुची निर्माण करणारा कार्यक्रम सादर केला. कला ही समूहाला प्रयोग काळातरी एकत्र सकारात्मक सुसंवाद राहण्यासाठी प्रवृत्त करते, यातून समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधनही होते, अशा प्रकारचे मत याप्रसंगी प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी व्यक्त केले. मिलिंद केळकर यांनी नाट्य संदेशाचे वाचन केले. या सर्व प्रयोगात प्रथमेश आणि प्रांजली इंगळे, आलोक आणि अक्षता जोगदनकर, सायली ,आकांक्षा, अंजली चव्हाण, अर्णव देशपांडे,धनश्री गवस,आर्या करपे,ऋतुजा केळकर यांनी तीनही वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यप्रयोगातून जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यास या बाल कुमार आणि युवा कलाकारांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे, समाजसेविका सीमा जोगदनकर, दर्शन पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

२५६ देशात साजरा होणाऱ्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त शांतता आणि संयम यातून समाजहित साधले जाईल, अशा भावनेने अनेक रंगकर्मींनी आपल्या कला कार्यातून सहभागी व्हावे, असे सुचवण्यात आले आहे.