‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली पंचप्रण शपथ !

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रमात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान देशभरात साजरा करण्यात येईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे मेरी माटी मेरा देश अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत खासदार गोपाळ शेट्टी यांनी मालाडच्या चाचा नेहरू उद्यान येथे पंचप्रण शपथ विद्यार्थी आणि नागरिकांसोबत घेतली.

याप्रसंगी महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिगावकर, भाजप मुंबई सचिव युनुस खान, योगश वर्मा, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर तिवाना, जिल्हा सरचिटणीस बाबा सिंह, माजी नगरसेविका जया तिवाना, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.