युनिव्‍हर्सिटी लिव्हिंगकडून स्‍टडी अब्रॉड बडी लाँच

मुंबई: उच्‍च शिक्षणासाठी परदेशात जाण्‍याचा अनुभव अद्वितीय आहे, पण काही पैलूसंदर्भात नवीन आणि अज्ञात असल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांसाठी कधी-कधी आव्‍हानात्‍मक ठरू शकते. ही बाब ओळखत युनिव्‍हर्सिटी लिव्हिंग या पुरस्‍कार-प्राप्‍त विद्यार्थी निवास व्‍यासपीठाने स्‍टडी अब्रॉड बडी व्‍यासपीठ लाँच केले आहे. हे व्‍यासपीठ परदेशात उच्‍च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्‍यांना सामना करावी लागणारी आव्‍हाने आणि गरजांचे निराकरण करत परदेशात शिक्षण घेण्‍याच्‍या अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

विद्यार्थ्‍यांना सामना करावे लागणारे सर्वात सामान्‍य आव्‍हान म्‍हणजे माहितीची मर्यादित उपलब्‍धता आणि योग्‍य मार्गदर्शनाचा अभाव. युनिव्‍हर्सिटी लिव्हिंगच्‍या तज्ञांच्‍या समर्पित टीमने डिझाइन केलेला स्‍टडी अब्रॉड बडी विद्यार्थ्‍यांना अल्टिमेट माहिती देणारा स्रोत आहे. १००० हून अधिक एज्‍युकेशन कन्‍सल्‍टण्‍ट पार्टनर्सच्‍या व्‍यापक जागतिक नेटवर्कसह आम्‍ही विद्यार्थ्‍यांना जगभरातील सर्वोत्तम संधी देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.

एआय समर्थित स्‍टडी अब्रॉड बडी व्‍यासपीठ विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय शिक्षणाच्‍या दिशेने प्रत्‍येक पावलामध्‍ये साह्य करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हे व्‍यासपीठ सर्वसमावेशक सोल्‍यूशन्‍स देते, जसे युनिव्‍हर्सिटी आणि कोर्स शॉर्टलिस्टिंग, कनेक्टिंग विथ फ्युचर क्‍लासमेंट्स, व्‍हॉट्सअ‍ॅप ग्रुप, एआय-पॉवर्ड इन्‍फॉर्मेशन अ‍ॅक्‍सेस आणि इतर अनेक.

युनिव्‍हर्सिटी लिव्हिंगचे सीईओ आणि संस्‍थापक सौरभ अरोरा म्‍हणाले, ‘आम्‍हाला युनिव्‍हर्सिटी लिव्हिंगचे एआय-पॉवर्ड स्‍टडी अब्रॉड बडी व्‍यासपीठ सादर करण्‍याचा आनंद होत आहे, जे स्‍टडी अब्रॉड विभागांतर्गत विकासाला चालना देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हे व्‍यासपीठ शैक्षणिक संस्‍था व युनिव्‍हर्सिटींसाठी गेम-चेंजर आहे. अधिक सुशिक्षित आणि पात्र विद्यार्थी असल्‍यास आंतरराष्ट्रीय विद्यार्थी रिक्रूटमेंटचा दर्जा वाढतो. आमचा वेळ आणि संसाधनाची बचत करण्‍यासह माहिती सुलभपणे उपलब्‍ध करून देत आणि निष्‍पक्षपणे निर्णय घेण्‍याला चालना देत विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.’