मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्यावतीने उपयुक्त कार्यशाळा…

मुंबई:मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या विद्यमाने येत्या शनिवारी ३ ऑगस्ट आणि रविवारी ४ ऑगस्ट २०२४ ला सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळात संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा ‘प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा’ आणि ‘आवाजाची कार्यशाळा’ या दोन कार्यशाळा अत्यंत अल्प शुल्कात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञ वैभव चाळके (ज्येष्ठ पत्रकार ) आणि उमेश घळसासी (नाट्य-चित्रपट-पत्रकारिता व्याख्याता) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर सहभागींना, गरवारे संस्थेकडून इ- प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक कार्यशाळेसाठी शुल्क ५००/- रुपये असेल तर दोन्ही कार्यशाळांसाठी नोंदणी करणाऱ्यांना सवलतीच्या दरात म्हणजे ७५०/- रुपये शुल्क देऊन दोन्ही कार्यशाळा करता येतील. नावनोंदणीसाठी संस्थेच्या https://www.gicededu.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ९९८७३९५४५७ आणि ८५९१५९०१७४ (9987395457, 85915 90174) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या समन्वयक नम्रता कडू यांनी केले आहे.