विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागात विज्ञान मेळावा !

मुंबई : उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागात विज्ञान मेळावा दिनांक १ सप्टेंबर २०२३ ला घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा समस्या परिसरातील समस्यांना तोंड देण्याची वैज्ञानिक क्षमता उद्याच्या नागरिकांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ आयलँड यांच्या मदतीने करण्यात आले होते.

यावेळेस विद्यार्थ्यांनी नवीकरणाक्षम ऊर्जा स्रोत, प्रकाश संश्लेषण, मृदा न्यूटनचे नियम ,चुंबकीय गुणधर्म तसेच पूरनियंत्रण यंत्रणा इत्यादी अनेक विषयांवर जवळ जवळ ३६आकर्षक प्रकल्प त्यांच्या विज्ञान शिक्षकांच्या मदतीने मांडले. स्पर्धेसाठी लक्ष्मीशंकर यादव नॅशनल कॉलेज बांद्रा आणि विदूला सावे एसएनडीटी महाविद्यालय सांताक्रुझ यांनी तज्ज्ञ परीक्षक म्हणून काम पाहिले.

विद्यार्थ्यांच्या या वैज्ञानिक क्रियाशीलतेचे कौतुक बक्षीस देखील याच प्रसंगी देऊन करण्यात आले. उद्याचा नागरिक हा विज्ञाननिष्ठ असला पाहिजे तरच आपण आपल्या पंतप्रधानांचे मेक इन इंडिया हे स्वप्न साध्य करू शकतो, असा विश्वास इनरव्हील संस्थेच्या ३१४ जिल्ह्यांच्या अध्यक्षा प्रेरणा रायचूर यांनी दिला. याप्रसंगी या संस्थेचे सभासद अध्यक्ष पारुल गांधी आणि सभासद आरती रूपानी यांनी संपूर्ण नियोजनामध्ये मोलाचे योगदान दिले.