पुण्यातील शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटच्या वनाहा प्रकल्पासाठी सुप्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी शाहिद आणि मीरा कपूर ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई: शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट हा भारताचा सर्वाधिक भरवशाचा रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. त्यांच्या पुणे येथील बावधन मुख्य प्रकल्प वनाहासाठी (VANAHA) सुप्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांच्या नावाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. वनाहाचा आलिशान प्रकल्प तब्बल ५ दशलक्ष चौरस फूट जागेवर विस्तारलेला असून त्याची महसूल क्षमता जवळपास रू. ४,०००/- कोटीं इतकी आहे.

सुमारे १,००० एकर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या गृहसंकुलाचा एक भाग, ज्यामध्ये ३५० एकर पेक्षा जास्त मोकळ्या आणि हिरव्यागार जागा आहेत. वनाहा हा निवासी, व्यावसायिक आणि रिटेल जागांचा एक उत्कृष्ट मिश्र-वापर विकास आहे. विहंगम दृश्यांसह विस्तीर्ण ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स, ज्याला भारतातील शीर्ष गोल्फ आणि विश्रांतीच्या ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले गेले आहे. हा पुण्याचा एकमेव १८-होलची सोय असलेला खासगी गोल्फ कोर्स आहे. या प्रकल्पाचे ठिकाण नयनरम्य टेकड्या आणि हिरव्यागार रमणीय जागेवर वसलेले आहे. येथील दरीत ४०० हून अधिक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींची वैविध्यपूर्ण श्रेणी आहे. जी एक पुनरुज्जीवन, उत्साहवर्धक वातावरण तयार करते. त्याचप्रमाणे रहिवाशांना काळजीपूर्वक नियोजन करण्यात आलेली घरं प्रदान करते.

शांतता आणि संपर्क यांच्यातील मधुरतेवर भर असलेला वनाहा रहिवाशांना घराला घरपणाची आदर्श मांडणी देऊ करतो. वनाहाच्या प्रत्येक पैलूला काळजीपूर्वक घडवले असून त्यामुळे रहिवासी स्वत:च्या अभयारण्य सदृश निसर्गाशी सहज जोडला जातो.

वनाहा चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून शाहिद कपूर आणि मीरा कपूर प्रकल्पाच्या अभिनव वैशिष्ट्याचा प्रचार करताना आपल्या करिश्मा आणि प्रभावाची छाप उमटवतील. त्यांचे समर्थन वनाहाच्या कुटुंब-केंद्री स्थितीला बळकट करेल आणि संभाव्य घर खरेदीदारांसोबत अनुनाद निर्माण करेल. ही सेलेब्रिटी जोडी अभिजातपणा आणि सुसंस्कृतपणासाठी ओळखली जाते, सामर्थ्यवान जोडपं कौटुंबिक मूल्यं, एकत्व, समुदाय उभारणी आणि निसर्गाशी सुसंगत राहण्याची खोल समज यावर भर देतात.

या भागीदारीवर आपलं मत व्यक्त करताना शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटचे बिझनेस हेड आणि चीफ इनव्हेस्टमेंट ऑफिसर नीरव दलाल म्हणाले, ‘आमच्या वनाहा प्रकल्पाकरिता ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून शाहिद आणि मीरा कपूर यांची निवड करताना आनंद वाटतो. या जोडीचा अभिजातपणा, सुसंस्कृतता, उत्कृष्ट चोखंदळपणा आणि हटके सिद्धता या आलिशान प्रकल्पाचे अगदी योग्यपणे प्रतिनिधित्व करतात. संलग्न उत्कृष्टता, विश्वासार्हता आणि कृपा मानकांमुळे शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटला सिद्ध ठेवते. ही संघटना प्रकल्पाची दृश्यमानता वाढवेल आणि संभाव्य ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घरांपर्यंत नेईल अशी कल्पना करतो.’

या भागीदारीबद्दल उत्साह व्यक्त करताना प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर म्हणाला, ‘शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट आणि त्यांच्या प्रतिष्ठित प्रकल्प वनाहाशी निगडीत असणे हा आमचा सन्मान समजतो.उत्कृष्टता, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या समाधानासाठी ब्रँडच्या समर्पणावर आमचा विश्वास आहे. कारण त्यांची मूल्यं आमच्याशी मिळती-जुळती आहेत. एक शहर म्हणून पुणे हे कायमच आमच्या मनाच्या अगदी जवळ आहे. तसेच शहरी राहणीमान आणि शांत वातावरणाचा वनाहा सुसंवादी संगम आमच्या शैलीला साजेसा आहे. आम्हाशला फलदायी सहकार्याची अपेक्षा आहे. वनाहाद्वारे प्रदान करण्यात आलेला आराम आणि आलिशानपणाचा आनंद घेण्यासाठी संभाव्य गृहखरेदीदारांना प्रेरित करण्याची संधी मिळेल.’

मीरा कपूरने सांगितले, ‘आम्ही या विकासाचा एक भाग बनल्याचा आनंद वाटतो. शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटचा वनाहा हा हिरवाईने वेढलेला एक उत्कृष्ट प्रकल्प आहे. सोयी आणि नैसर्गिक सौंदर्याचा मिलाप शोधत असलेल्या आधुनिक कुटुंबांसाठी हे योग्य ठिकाण आहे असे मला वाटते. आमचे सहकार्य वनाहाने देऊ केलेल्या असाधारण जीवनपद्धतीवर प्रकाश टाकेल याची खात्री आम्हाला वाटते.’

शापूरजी पालोनजीचा वनाहा राहणीमानाचा अपवादात्मक अनुभव, आलिशानपणाचा सुलभ मिलाफ, शांतता आणि सर्वोच्च सुविधा देतो. रहिवासी क्लबहाऊस, स्विमिंग पूल आणि फिटनेस सेंटर्ससह विविध वैशिष्ट्यांमध्ये सहभागी होऊ शकतात. प्रस्तावित १० -पदरी राष्ट्रीय मुंबई-बंगळुरू महामार्ग, चांदणी चौक येथे प्रस्तावित ८-पदरी फ्लायओव्हर आणि प्रस्तावित ६-पदरी पौड महाड राष्ट्रीय महामार्ग यासारख्या प्रमुख मार्गांशी या प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी मिळते. ज्यामुळे तेथील रहिवाशांना सोयीस्कर प्रवास करता येईल.

हिंजवडी, महाळुंगे- माण हाय-टेक सिटी पार्क आणि बाणेरसारख्या प्रमुख आय टी (IT) हबजवळ धोरणात्मकदृष्ट्या वसलेला वनाहा व्यावसायिकांसाठी प्रचंड आकर्षण आहे. शिवाय, फ्लेम युनिव्हर्सिटी आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि व्यावसायिक केंद्रांसह सुस्थापित सामाजिक आणि नागरी पायाभूत सुविधांनी विकास वेढलेला आहे. आशियातील अव्वल ५ मध्ये स्थान मिळालेल्या प्रशंसेस पात्र ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सची उपस्थिती या अपवादात्मक प्रकल्पाचे आकर्षण आणखी वाढवते.