समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाद्वारे पीएम सोलर आणि टू ईव्ही प्रकल्पांमधून ५०,००० रोजगार निर्मिती होणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई:ऑटोमोटिव् स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (ए.एस .डी. सी) आणि सामाजिक न्याय मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाद्वारे पीएम सोलर आणि टू ईव्ही प्रकल्पांमधून ५०,००० रोजगार निर्मिती होणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले. मुंबई ऑटोमोटिव स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल (एस आय ए एम ए सी एम) तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, अवजड उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालय यांनी भागीदारी प्रकल्प उभा केला आहे.

या उपक्रमाच्या उद्देशाबाबत महाराष्ट्र सामाजिक न्याय आयुक्त ओमप्रकाश भाकोरीया यांनी समाजातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या वंचित गटांमध्ये गटांमध्ये संधीचे समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी अशा स्वरूपाचे उपक्रम होणे आवश्यक असल्याचे सांगितले. इलेक्ट्रिक मोबिलिटीचे फायदे आणि सौर अर्थव्यवस्थेतील संधी ही देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर भाकोरिया यांनी हेही सांगितले की ते एका टास्क फोर्स ते नेतृत्व करीत असून त्यांनी पुण्यात मार्च २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात एका बैठकीचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये सर्व कॉर्पोरेशनचे एमडी आणि सामाजिक न्याय विभाग सहभागीतांच्या प्रकल्पामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.
यामध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना विद्युत आणि सौर जगताचे फायदे मिळवून देण्याचे सूक्ष्म प्रशिक्षण मिळेल असेही त्यांनी सांगितले.

ऑटोमोटिव स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल (ए एस बी सी) चे उपाध्यक्ष वेंकेश गुलाटी यांनी सौर जगताचे आणि विद्युत वाहने उपक्रमातील आमच्या या समर्पित प्रयत्नांद्वारे सामाजिक बदल विशेषता महिलांना केंद्रस्थानी ठेवून सशक्त करण्याचे मत मांडले. आम्ही केवळ महाराष्ट्रातील वाढते आणि सौर क्षेत्रामधील संधी उघडत नाही तर परिवर्तनाच्या प्रवासात महिला आघाडीवर राहतील याबाबतची सामाजिक बांधिलकी आमची उच्च पातळीवरची असल्याचे त्यांनी नमूद केले.