जागतिक महिला दिन ‘जागतिक महिला दिन साजरा’ या नाटकाने संपन्न

पुणे:स्त्रियांची सामाजिक गुंतवणूक केल्याने सर्वप्रकारच्या राष्ट्रीय संपत्तीत समृध्दी होईल.. या संदेशाला अनुसरून गुरुस्कूल गुफानच्या विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनी ‘जागतिक महिला दिन साजरा’हे नाटक सादर केले. स्त्रीनेच स्वतः स्वतःचे अस्तित्व,शिक्षण, चारित्र्य, आणि स्वातंत्र्यासाठी समर्थ उभे राहिले पाहिजे या आशयाच्या प्रा.देवदत्त पाठक लिखित आणि दिग्दर्शित नाटकात धनश्री गवस आणि अक्षता जोगदनकर यांनी नाटकात आपापल्या भुमिका समर्थपणे पेलल्या.

प्रारंभी प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी ‘स्त्रिया सामाजिक गुंतवणूकीचे बलस्थान’ या विषयावरची मार्गदर्शन कार्यशाळा रंगमंचीय खेळातून गुरूस्कूल गुफानच्या वतीने घेतली. महिलांचा उस्फूर्त सहभागासाठी सीमा जोगदनकर, उषा देशपांडे, ऋतुजा केळकर,नेहा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.