मुंबई : पेटीएम पहिल्यांदाच पेटीएम यूपीआय लाइट बॅलन्स कार्यान्वित केल्यास जवळपास १०० रूपयांची खात्रीदायी वेलकम कॅशबॅक देत आहे. पेटीएम अॅपवर यूपीआय लाइट कधीच अयशस्वी न होणारी अत्यंत गतीशील पेमेंट्स करण्याची सुविधा देते.
यूपीआय लाइटसह वापरकर्ते बँक व्यवहारांच्या मर्यादेबाबत चिंता न करता लहान मूल्य असलेले अनेक यूपीआय पेमेंट्स करू शकतात. सुरक्षित ऑन-डिवाईस बॅलन्स यूपीआय लाइट दैनंदिन लहान मूल्याचे व्यवहार अत्यंत जलद करते, ज्यामुळे प्रत्येक पेमेंटसाठी यूपीआय पिन क्रमांक प्रविष्ट करण्याची गरज दूर होते. कार्यान्वित झाल्यानंतर यूपीआय लाइट वापरकर्त्यांना जवळपास २०० रूपयांपर्यंतचे त्वरित व्यवहार करण्याची सुविधा देते, ज्यामधून जलद अनुभव मिळतो. दिवसातून दोनदा अधिकतम २,००० रूपये यूपीआय लाइटमध्ये भरता येऊ शकतात, ज्यामुळे दररोज एकूण ४,००० रूपयांपर्यंत मूल्याचा वापर करता येऊ शकतो.तसेच, यूपीआय लाइटचा वापर करत केलेले पेमेंट्स पासबुकला डि-क्लटर करतात. हे लहान मूल्याचे व्यवहार आता पेटीएम बॅलन्स आणि हिस्ट्री सेक्शनमध्ये दिसू शकतात. एनपीसीआयनुसार, वापरकर्त्यांना त्यांच्या बँकांकडून एसएमएसच्या रूपात यूपीआय लाइटच्या माध्यमातून केलेल्या सर्व पेमेंट्सची दैनंदिन व्यवहार हिस्ट्री मिळेल.
पेटीएम पेमेंट्स बँक यूपीआयमधील सर्वात मोठी संपादनकर्ता आणि लाभदायी बँक म्हणून पहिल्या क्रमांकाची बँक असण्यासोबत आघाडीची रेमिटर बँक देखील आहे. यूपीआय पेमेंट्सच्या बाबतीत पेटीएम सर्वोच्च यशस्वी दर असलेली उद्योगातील सर्वात गतीशील बँक आहे. नवोन्मेष्काराला चालना देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बँक यूपीआय लाइट लॉन्च करणारी पहिली पेमेंट्स बँक आहे.
पेटीएम पेमेंट्स बँक जानेवारी २०२३ मध्ये १,७६५.८७ दशलक्ष व्यवहारांसह सलग २० महिन्यांसाठी सर्वात मोठी यूपीआय लाभार्थी बँक राहिली. तसेच देशातील सर्व प्रमुख बँकांच्या अग्रस्थानी आहे. ३८९.६१ दशलक्ष नोंदणीकृत व्यवहारांसह एनपीसीआयच्या नवीन अहवालानुसार बँक यूपीआय व्यवहारांसाठी अव्वल १० रेमिटर बँकांपैकी एक आहे. पीपीबीएल नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन (एनईटीसी) फास्टटॅगसाठी आघाडीची संपादनकर्ता बँक आहे. जानेवारी २०२३ मध्ये पीपीबीएलने इशुअर बँक म्हणून ५८.३४ दलशक्ष व्यवहारांची आणि अॅक्वायर बँक म्हणून ४७.७१ दशलक्ष व्यवहारांची प्रक्रिया केली.