मुंबई: होमिओपॅथीमधील अग्रणी कंपनी डॉ. बत्रा’जने भारतातील प्लॅनस पिग्मेंटोससच्या जवळपास ४,००० रुग्णांचे यशस्वीरित्या उपचार केले आहेत. या आजाराचा सामान्यत: सूर्यप्रकाशात येणारे चेहरा, मान आणि शरीराच्या वरील भागांवर परिणाम होतो. या आजारामध्ये प्रथम काही आठवड्यांपासून विकसित झालेले जांभळ्या रंगाचे, खाज सुटणारे डाग दिसून येतात. यामुळे त्वचेवर रंगद्रव्य निर्माण होतो आणि कधी-कधी लायकेन प्लॅनसमुळे लेसी सफेद डाग तयार होतात, तसेच गुप्तांग आणि श्लेष्मल त्वचेने झाकलेले तोंड, ओठ आणि जीभ यांसारख्या शरीराच्या इतर भागांमध्ये वेदनादायी फोड येतात. केस गळणे, टाळूचा रंग बदलणे, नख खराब होणे/गळणे आदी या आजाराची इतर काही लक्षणे आहेत.
डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार-प्राप्त डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, ‘५० वर्षांपासून होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर म्हणून माझा विश्वास आहे की, होमिओपॅथी हा लायकेन प्लॅनस पिग्मेंटोसससाठी प्राधान्य उपचार आहे. डॉ. बत्रा’ज ने आतापर्यंत देशभरातील २,०६४ पुरूष आणि १,९२७ महिलांसह लायकेन प्लॅनस पिग्मेंटोससच्या जवळपास ४,००० रुग्णांचा उपचार केला आहे. रुग्ण बरे झाल्यानंतरही हा आजार पुन्हा होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून होमिओपॅथी औषधोपचार सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो.’’
केस स्टडी: मुंबईत बोरिवलीयेथील एका ५३ वर्षीय पुरुष रुग्णाने लायकेन प्लॅनस पिग्मेंटोसस या दुर्मिळ आजारावर मात केली आहे. या आजारामध्ये त्वचेवर अनियमित आकाराचे तपकिरी ते राखाडी मॅक्युल्स आणि चट्टे येतात. चेहऱ्यासाठी मेसोथेरपी आणि त्वचारोग तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या स्किनकेअरसारख्या इतर कोणत्याही प्रकारच्या उपचारांनी रुग्णासाठी काम केले नाही. तेव्हा रूग्णाला होमिओपॅथीद्वारे या दुर्मिळ आजारावर उपाय मिळाला. होमिओपॅथिक वैद्यकीय यंत्रणा या आजारावर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे आणि १०० टक्केद नैसर्गिक व कोणत्याही दुष्परिणामांशिवाय सुरक्षित आहे.
लायकेन प्लॅनस पिग्मेंटोससने पीडित रूग्ण असलेली मुंबई, बेंगळुरू, पुणे, अहमदाबाद आणि चेन्नई ही प्रमुख शहरे आहेत. होमिओपॅथी वैद्यकीय यंत्रणा अनेक सौम्य व गंभीर आजारांचा उपचार करते आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय सकारात्मक परिणाम दिले आहेत. यामध्ये त्वचेची अॅलर्जी, केस गळणे, पीसीओएस, मायग्रेन, रजोनिवृत्ती, चिंता आणि नैराश्य, त्वचारोग, सोरायसिस, कमी प्रतिकारशक्ती, तणाव, टॉन्सिलिटिस अशा बऱ्याच आजारांचा समावेश आहे.