ला पिंकची सौंदर्य आणि स्किनकेअर क्षेत्रात क्रांती

मुंबई : भारतात सौंदर्य आणि स्किनकेअर क्षेत्रात क्रांती घडवून आणत ला पिंकने देशात प्रथमच १०० टक्के मायक्रोप्लास्टिक मुक्त त्वचा उत्पादने बाजारात आणली आहेत. ला पिंकची उत्तम उत्पादने फ्रान्स, अमेरिका आणि स्वित्झर्लंडमधून आयात केलेल्या खास आणि नैसर्गिक घटकांसोबत अनेक महिन्यांच्या संशोधन आणि विकासानंतर फ्रेंच तज्ज्ञांनी तयार केली आहेत. ला पिंक रोपांवर आधारित बांधीव घटकांचा वापर करून त्वचेसाठी सुरक्षित उत्पादने देते आणि त्यातून त्यांच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये १०० टक्के मायक्रोप्लास्टिकमुक्त घटक तयार केले जातात.

भारताच्या सातत्यपूर्ण आणि प्रचंड वेगाने वाढणाऱ्या सौंदर्य उद्योगातील प्रवाह पाहता ला पिंकच्या खास उत्पादनांमध्ये एक आश्चर्यकारक घटक समाविष्ट आहे. तो म्हणजे हळद. हा एक शक्तिशाली पदार्थ आहे, जो त्याच्या सूज प्रतिरोधक आणि अँटीसेप्टिक घटकांसाठी ओळखला जातो. तो एक नैसर्गिक त्वचा स्वच्छ करणारा आणि त्वचेला आर्द्रता देणारा घटक आहे. त्यामुळे तुमची त्वचा उजळ व मऊसूत होते आणि त्यामुळे तुम्हाला तरूण व चमकदार त्वचा मिळते.

ला पिंकचे संस्थापक नितीन जैन म्हणाले की, ‘ ला पिंकमध्ये आम्ही या गोष्टीची काळजी घेतो की, आमचे प्रत्येक उत्पादन १०० टक्के मायक्रोप्लास्टिकने मुक्त असेल आणि त्याचवेळी ते पॅराबिन/सल्फेट/एसएलएसमुक्त, व्हिनग, त्वचेसाठी चाचणी केलेले, क्रूरतामुक्त आणि एफडीए मान्यताप्राप्त असेल. आमचे ध्येय ग्राहकांसाठी जास्तीत-जास्त फायदे देत असताना सर्वोत्तम किंमत उपयुक्त सोल्यूशन्स देण्याचे आहे. आम्हाला विश्वास आहे की, आमची उत्पादने बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरतील.’

ला पिंकची उत्पादने १८-३५ वर्षे वयोगटासाठी तयार झालेली असून त्यांच्याकडे सध्या १७ त्वयचेची काळजी घेणारी उत्पादने आहेत आणि आगामी महिन्यांमध्ये ते केस आणि वैयक्तिक काळजीच्या क्षेत्रात उत्पादने आणणार आहेत. या ब्रँडची उत्पादने त्यांच्या अधिकृत वेबसाइट तसेच अमेझॉनआणि फ्लिपकार्टवर आणि मध्य प्रदेश, पंजाब आणि हरयाणा येथील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. हा ब्रँड लवकरच इतरही सर्व बाजारपेठा आणि भौगोलिक प्रदेशांमध्येही उपलब्ध होईल.