मुंबई:रितेश विलासराव देशमुख होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस मराठी’मध्ये ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर पहिल्यांदाच राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक हा खास क्षण आज ५ एप्रिलला रात्री ८:०० वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहू शकतात.
टेलिव्हिजनवर भव्य पदार्पण करत, ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर रितेश विलासराव देशमुख आपले ( भाऊ) होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस मराठी’मध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित होणार आहे. आज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर होणारा हा खास खुलासा चुकवू नका.