मुंबई: जुहूच्या विद्यानिधी व्ही.पी. मराठी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एमकेसीएल (MKCL) संस्थेचे स्क्रॅच व पायथॉन कोडिंग अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ श्रीराम मंत्री विद्यानिधी इन्फॉतेच
येथे संपन्न झाला.
इयत्ता ८ वी च्या ६२ विद्यार्थ्यांनी स्क्रॅच व इयत्ता ९ वी च्या ७ विद्यार्थ्यांनी पायथॉन अशा एकूण ६९ विद्यार्थ्यांनी व्हिटाच्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून प्रमाणपत्रे प्राप्त केली.
रोटरी क्लब ऑफ मुंबई रॉयल्स या सेवाभावी संस्थेच्या मौल्यवान पाठिंब्याने हा कार्यक्रम पार पडला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्यांना प्रोत्साहन मिळाले.या सर्वांना समविताच्या शिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले.
भविष्यवेधी उपक्रमाच्या प्रकल्प समन्वयक रोटेरियन संगीत मोदी व रोटेरियन, मंजू अग्रवाल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. मुलांचे कौतुक करण्यासाठी पालकही आवर्जून उपस्थित राहिले होते.
उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजीव मंत्री यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व कोडिंग क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे स्क्रॅच कोडिंग व पायथॉन प्रोग्रामिंगमधील ज्ञान वाढले व आयटीचा भक्कम पाया तयार झाला. शाळेने रोटरी क्लब ऑफ रॉयल्स व त्यांच्या सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.