रक्षाबंधन ‘सामाजिक बांधिलकी’ने साजरा!

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्ही.पी. मराठी माध्यम हायस्कूल आणि विद्यानिधी कमला रहेजा वाणिज्य महाविद्यालयाच्या (कॉमर्स कॉलेज) विद्यार्थिनींनी रक्षाबंधन उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

या शैक्षणिक संस्थेचा विश्वास आहे की संस्कार हे कृतीतूनच रुजतात, आणि त्याच विचारातून विद्यार्थिनींनी पोलीस, सुरक्षा रक्षक, शाळेतील मदतनीस आणि रिक्षा चालकांना राख्या बांधल्या. समाजाच्या खऱ्या रक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आदर, कृतज्ञता आणि सामाजिक जाणीव रुजवणारा ठरला.