महिलांसाठी ‘लाइटस्टाइल’ दागिन्यांच्या नव्या श्रेणीद्वारे ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अनोखे कलेक्शन !

मुंबई:‘पीएनजी ज्वेलर्स’ने ‘लाइटस्टाइल’ ही कमी वजनाच्या दागिन्यांसाठीचे ‘लाइटस्टाइल’ हे नवे कलेक्शन सादर केले आहे. हे कलेक्शन भारतातील ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या सर्व दालनांमध्ये उपलब्ध असेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये कमी वजनाच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. फॅशन ॲक्सेसरीच्या पलीकडे या दागिन्यांतून महिलांची जीवनशैली आणि मूल्ये प्रतिबिंबित होतात. आजच्या गतिमान जगात रोज नव्या आव्हानांना महिलांना सामोरं जावं लागतं.‘पीएनजी ज्वेलर्स’ची ही नवी ‘लाइटस्टाइल’ ज्वेलरी रोजचा धावपळीचा वावर सहज करेल. व्यवसाय आणि नोकरी करणारी महिला कोणते दागिने वापरते, यातूनच तिची ओळख आणि तिची स्टाइल अधोरेखित होते. व्यवसाय आणि नोकरीत होणाऱ्या मीटिंग्स, कामाशी निगडित छोटे-मोठे समारंभ, भेटीगाठी या सगळ्या ठिकाणी रोजच्या वापरातील दागिने कितीही कलात्मक असले तरीही त्यांच्या वजनामुळे हे दागिने सहजपणे वापरणे महिलांसाठी सोयीचे असतेच असे नाही.

‘लाइटस्टाइल’ ही कमी वजनाची दागिन्यांची नवी श्रेणी मात्र या सर्व ठिकाणी सहजपणे वापरता येते. या श्रेणीतील कलात्मक डिझाईन्स दैनंदिन वावर आत्मविश्वासानं आणि चपळाईनं होण्यात कुठंही अडसर ठरत नाहीत. महिलांचा व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील वावर सहजपणे व्हावा, हाच विचार या मागे आहे. ‘लाइटस्टाइल’ ही नवी दागिन्यांची श्रेणी आजच्या महिलेच्या गतिमान जीवनशैलीला पूरक असून हे कमी वजनाचे हिऱ्यांचे आणि सोन्याचे दागिने २२ आणि १८ कॅरेटमध्ये डिझाईन करण्यात आले आहेत.

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले,‘आम्ही पीएनजी ज्वेलर्सद्वारे लाइटस्टाइल सादर करत असताना, दागिन्यांच्या सौंदर्याबरोबर महिलांच्या सामर्थ्याचा आणि स्वातंत्र्याचाही विचार केला आहे. हा विचार साजरा करताना महिलांचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्यातल्या अष्टपैलुत्वाचं प्रतीकही या दागिन्यांमध्ये कसं उमटेल, हेही पाहिलं आहे. हे कलेक्शन भारतातील आमच्या सर्व दालनांमध्ये सादर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे.’

महिलांप्रती असणाऱ्या आदराचं आणि कौतुकाचं प्रतीक म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’ आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना घेऊन आले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २०% पर्यंत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% सवलत मिळणार आहे. ‘लाइटस्टाइल’ या नव्या दागिन्यांची श्रेणी ९,९९९/- रुपयांपासून सुरू होत असून ती सर्व दालनांमध्ये उपलब्ध आहे.