आकार जाहिरात संस्था ‘जाहिरात क्षेत्रातील सर्वोत्तम एजन्सी’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई:आकार जाहिरात संस्थेला जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महोत्सवात ‘जाहिरात क्षेत्रातील सर्वोत्तम एजन्सी’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बलवीर सिंग राठोड, मीनाक्षी राठोड, अनिता प्रधान यांच्यासह विविध दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गिरीराज महाराज यांच्या आशीर्वादाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये इतर अनेक पुरस्कारही देण्यात आले होते. सन १९८० मध्ये स्थापन झालेल्या, आकार जाहिरात संस्थेचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे असून नवी दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद येथेही शाखांच्यामार्फत कार्यरत आहेत. या संस्थेच्या ख्यातनाम ग्राहकांमध्ये पर्यटन संचालनालय, ओएनजीसी, इंडियन ऑइल, इंडियन रेल्वे, डीजीआयपीआर महाराष्ट्र सरकार, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, एनटीपीसी , भारतीय विमानतळ प्राधिकरण, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इ. यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांचा समावेश आहे.