मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु!

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या पदव्युत्तर आणि पदविका (पूर्ण वेळ) अभ्यासक्रम,मास्टर ऑफ थिएटर आर्टस् अभिनय कौशल्य पदविका २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे, अशी माहिती अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांनी दिली आहे.

मास्टर ऑफ थिएटर आर्टस् अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा तत्सम दर्जाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि नाटकाचा अनुभव असणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. अभिनय कौशल्य पदविका (Diploma) अभ्यासक्रमासाठी (वय मर्यादा ३० वर्षापर्यंत) बारावी (H.S.C.) किंवा तत्सम दर्जाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि नाटक, शॉर्ट फिल्म किंवा फिल्ममध्ये अनुभव असणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील.

अभ्यासक्रमाचा कालावधी मास्टर ऑफ थिएटर आर्टस् २ वर्ष पूर्ण वेळ कोर्स अभिनय कौशल्य पदविका १ वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ असून दोन्ही अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टसच्या https://theatreartsdepartmentmu.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ९९८७२१८७७९ या क्रमांकावर दूरध्वनी करावा. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार ११.०० ते ५.०० या वेळेत, १ ला मजला, सांस्कृतिक भवन, मुंबई विद्यापीठ,विद्यानगरी उत्तर गेट समोर, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ५५ संपर्क साधावा.