ई-स्प्रिंटोने हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर अमेरी केली लॉन्च

मुंबई : भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड, ई-स्प्रिंटोने आपल्या अशा बहुप्रतीक्षित ईव्ही टू-व्हीलर अमेरीचे (Amery) अभिमानाने अनावरण केले आहे जी या ब्रँडच्या प्रतिष्ठित लाइनअपमध्ये सामील होणारी दुसरी हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. रिमोट कंट्रोल लॉक, चोरीविरोधी अलार्म, मोबाइल चार्जिंग सॉकेट, फाईंड माय व्हेईकल आणि बरेच काही यासह सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य आणि एकाच चार्जवर १४० किलोमीटरची प्रभावशाली श्रेणी असलेले हे मॉडेल, २० ते ३५ वयोगटातील युनिसेक्स शहरी रायडर्सना लक्ष्य करून निर्माण करण्यात आले आहे.

अमेरीचे नाविन्यपूर्ण डिझाइन आणि उच्च अभियांत्रिकी या बाबी, तिच्या प्रभावी वैशिष्ट्यांमध्ये स्पष्ट आहेत. २०० मि.मी.च्या अपवादात्मक ग्राउंड क्लिअरन्स आणि ९८ किलो वजनाच्या कर्ब वेट या बाबींचा अभिमान बाळगत अमेरी एक रोमांचक स्वारीचे (राईड) वचन देते, ज्यात आराम आणि गती यांना सहजपणे एकत्र आणले जाते. १,५०० वॅट बीएलडीसी हब मोटर, २,५०० वॅटची पीक पॉवर प्रदान करते, ज्यामुळे या स्कूटरला फक्त ६ सेकंदात प्रति तास ० ते ४० किलोमीटरपर्यंत जाण्यास शक्ती मिळून, ती ६५ कि.मी./तास उच्च गती गाठते. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक यांच्यामुळे इष्टतम नियंत्रण आणि सुरक्षिततेची हमी प्राप्त होते, तर १४० कि.मी. कमाल श्रेणीमुळे लांब अंतराचा प्रवास सहजतेने पार पाडला जातो. ब्लिसफुल व्हाईट, स्टर्डी ब्लॅक (मॅट) आणि हाई स्पिरीट यलो या तीन आश्चर्यकारक रंगांमध्ये उपलब्ध असलेली अमेरी अधिकृत ई-स्प्रिंटो डीलरशिप आणि देशभरातील शोरूममधून १,२९,९९९/- रुपयांच्या एक्स – शोरूम किंमतीत मिळू शकते.

ई-स्प्रिंटोचे संस्थापक आणि संचालक अतुल गुप्ता म्हणाले, ‘आम्ही आमच्या ग्राहकांना आणि इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात ई-स्प्रिंटो कुटुंबातील आमची नवीनतम जोड, अमेरीला सादर करण्यास उत्सुक आहोत. अमेरी ही नावीन्यपूर्णतेच्या सीमा पुन्हा परिभाषित करण्यासाठी आणि शहरी वाहतुकीचे एक रोमांचक परंतु पर्यावरण-सजग साधन प्रदान करण्याच्या आमच्या अटूट वचनबद्धतेचा एक दाखला आहे. तिचा प्रभावशाली वेग, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि मनमोहक सौंदर्यशास्त्र एकत्रितपणे स्वारीचा (राइडिंग) एक अनुभव अतुलनीय निर्माण करतात. अमेरीसह, आम्ही फक्त आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटरचा शुभारंभ करत नाही; तर आम्ही शहरी गतिशीलतेचा एक नवीन नमुना सादर करीत आहोत.’