डॉ. बत्रा’ज हेल्थकेअरद्वारे त्वचारोगांच्या उपचारांसाठी ‘एआय स्किन प्रो’

मुंबई : डॉ. बत्रा’ज हेल्थकेअर या जगातील होमिओपॅ‍थिक क्लिनिक्सच्या सर्वात मोठ्या साखळीने त्वचारोगांच्या उपचारामधील निदानासाठी जगातील पहिले एआय-समर्थित डिवाईस एआय स्किन प्रो लॉन्च केले आहे. दक्षिण कोरियामधून आयात मशिन जगातील फिफ्थ जनरेशन एआय-समर्थित स्किन अ‍ॅनालायझर आहे. ही मशिन त्वचेच्या पृष्ठभागावर दिसून येण्यापूर्वीच त्वचेच्या समस्यांचे सखोल निदान करते. ही त्वचाविषयक समस्यांचा उपचार करण्याची भावी पद्धत आहे.

डॉ.बत्रा’जने होमिओपॅथीसोबत सहयोगाने अत्यंत अद्वितीय तत्त्वाला संयोजित केले आहे, जे सर्वांगीण, सुरक्षित असण्यासोबत त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. एआय विश्लेषणावर आधारित वैयक्तिकृत उपचार तयार करण्यात आले आहेत, जसे मुरूमांसाठी एआय होमिओ क्लीअर, पिग्मेंटेशन आजारांसाठी एआय होमिओ ब्राइट, अ‍ॅण्टी-एजिंगसाठी एआय होमिओ युथ आणि बहुउद्देशीय उपचारांसाठी एआय होमिओ रेन्यू.

डॉ. बत्रा’ज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि अध्यक्ष पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, ‘डॉ. बत्रा’ज तंत्रज्ञानाच्या नेहमीच अग्रस्थानी आहे. आम्हाला त्वचाविषयक समस्या असलेल्या रूग्णांच्या फायद्यासाठी भारतात पहिल्यांदाच हे नवीन प्रगत एआय तंत्रज्ञान एआय स्किन प्रो लॉन्च करण्याचा आनंद होत आहे. जगातील आधुनिक तंत्रज्ञानासह २५० वर्ष जुने होमिओपॅथी शास्त्राचे संयोजन रूग्णांना सर्वोत्तम निष्पत्तींची खात्री देईल.’

एआय स्किन प्रो उपचार पर्याय भारत आणि दुबईमधील सर्व मेट्रो व निवडक शहरांतील निवडक बत्रा’ज क्लिनिक्समध्ये उपलब्ध असेल.