मुंबई : कलेक्शन्स (CLXNS) या आघाडीच्या डिजिटल-फर्स्ट डेब्ट रिझॉल्युशन कंपनीने लीगल अॅण्ड कम्प्लायन्सचे प्रमुख म्हणून सुमित कुमार बासू यांची नियुक्ती केली आहे. १९ वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेले सुमित या नवीन पदभारासाठी त्यांचे व्यापक ज्ञान आणि कौशल्याचा वापर करतील.
कलेक्शन्सचे प्रमुख म्हणून सुमित कुमार बासू आरबीआय मार्गदर्शकतत्त्वांचे काटेकोरपणे पालन होण्याची खात्री घेत कार्यक्षम फंड रिकव्हरीसाठी प्रबळ कायदेशीर आराखडा स्थापित करतील. त्यांचे नेतृत्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींसोबत सहयोग करत, कायदेशीर इकोसिस्टमचे नेटवर्क निर्माण करत आणि रिकव्हरी वाढवण्यासोबत नियामक अनुपालन राखत आणि खात्री घेत शाश्वत इकोसिस्टमला चालना देतील. नियामक अनुपालनाप्रती त्यांचे अतूट समर्पण आणि प्रभावी कायदेशीर धोरणे तयार करण्यात त्यांची कौशल्ये कलेक्शन्सची आर्थिक उद्योगातील स्थिती आणखी मजबूत करतील.
कलेक्शन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानवजीत सिंग म्हणाले, ‘आमचा ठाम विश्वास आहे की, सुमित यांचे कायदेशीर बाबींमधील व्यापक कौशल्य, तसेच रिकव्हरीज वाढवण्याचा त्यांचा प्रमाणित ट्रॅक रेकॉर्ड आमच्या कंपनीसाठी लाभदायी ठरेल. त्यांचे धोरणात्मक नेतृत्व कलेक्शन्सचे ध्येये संपादित करण्यामध्ये आणि आगामी वर्षांमध्ये आमच्या विकासाला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. आमच्या कायदा आणि अनुपालन कार्यांचे प्रमुख म्हणून सुमित कुमार बासू असण्यासह आम्ही कार्यक्षम आर्थिक सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या, तसेच सर्व कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांसह काटेकोरपणे अनुपालन करण्याच्या उत्तम स्थितीत आहोत.’
आपल्या नियुक्तीबाबत सुमित कुमार बासू यांनी सांगितले, ‘मला कलेक्शन्ससोबत सहयोग करण्याचा आणि कंपनीसाठी माझा दृष्टिकोन शेअर करण्याचा आनंद होत आहे, जो ‘लाखो स्वप्नांना प्रज्वलित करू शकणारा स्पार्क’ म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. कायदा आणि अनुपालन कार्ये वाढवण्याकरिता, आर्थिक क्षेत्रातील प्रख्यात कंपनी बनण्याच्या आमच्या प्रवासाला चालना देण्याकरिता टीमसोबत काम करण्यावर माझा मुख्य भर असेल. प्रामाणिकपणा व उत्कृष्टतेच्या संस्कृतीला चालना देत आम्ही व्यक्ती व व्यवसायांना आर्थिक आव्हानांचे निराकरण करण्यास आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा ओळखण्यास सक्षम करू.’