आयवूमीद्वारे ई-स्कुटर्स खरेदीवर सवलत !

ग्राहकांना २९ एप्रिलपर्यंत घेता येणार लाभ

मुंबई : आयवूमी एनर्जीद्वारे एस१, जीतएक्स आणि एस१ लाईट या सर्व गाड्यांवर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विशेष ऑफर्स आणि सवलतीची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आयवूमी स्टोर्समध्ये एस१, जीतएक्स आणि एस१ लाईट यांच्यासह गाड्यांवर सेल सुरु आहे, ७०,००० पासून ९१,९९९/- रुपये किमतींच्या गाड्यांवर डिस्काऊंट्स आणि डील्स देण्यात आल्या आहेत. ऍक्सेसरीज आणि इन्श्युरन्स यांचा डीलमध्ये समावेश आहे. ही विशेष सवलत २९ एप्रिल २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. १०,००० हुन जास्त आनंदी कुटुंबांचा आयवूमी एनर्जी परिवारात समावेश झाला आहे. उपयुक्त वैशिष्ट्ये परवडण्याजोग्या दरांमध्ये उपलब्ध करवून देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या आयवूमी एनर्जीने सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या, विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या स्वदेशी निर्मात्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

१००% भारतीय बनावटीची आयवूमी जीतएक्स अतिशय सुबक आणि आधुनिक असून अमेंडमेंट III फेज १ एआयएस १५६ सर्टिफिकेशन नुसार आता अजून जास्त सुरक्षित बनवण्यात आली आहे. आकर्षक आणि तरीही सहजसोपे डिझाईन असलेली जीतएक्स ग्राहकांचे लक्ष सहजपणे वेधून घेते. नव्या डिझाईनमध्ये गाड्यांचा एकंदरीत आकर्षकपणा वाढवण्यात आला असल्याने त्या पूर्वीपेक्षा जास्त शानदार दिसत आहेत.

आयवूमीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन भंडारी यांनी सांगितले, ‘आयवूमी ही कंपनी ग्राहकांच्या गरजा सातत्याने समजून घेते आणि त्या पूर्ण करण्यासाठी उपयुक्त व सर्वसमावेशक उत्पादने, सुविधा पुरवते. इन्श्युरन्स आणि व्हेईकल गार्ड या अतिरिक्त सुरक्षा प्रस्तुत करून आम्ही आमच्या ग्राहकांना सुधारित रायडींग अनुभव मिळवून देत आहोत. बाहेर काढता येईल अशी बॅटरी, वापरण्याजोगी बूट स्पेस आणि फक्त ८०० ग्राम वजनाचा चार्जर यांच्यासह उत्तम मायलेज ही सर्व वैशिष्ट्ये देणारा एकमेव ईव्ही ब्रँड आहे आयवूमी. आमच्या ग्राहकांना मनोसोक्त खरेदी करता यावी यासाठी अतुलनीय ऑफर्स आणि खूप चांगले मूल्य आम्ही मिळवून देत आहोत.’