लुफ्थांसा भारतातील कार्यसंचालनांमध्ये करणार वाढ

मुंबई : भारतातील आपल्या प्रबळ उपस्थितीला अधिक दृढ करत लुफ्थांसाने दोन नवीन मार्ग म्युनिक ते बेंगळुरू आणि फ्रँकफर्ट ते हैदराबाद यांची घोषणा केली. म्युनिक-बेंगळुरू मार्गावरील नवीन फ्लाइट्स आठवड्यातून तीन वेळा उड्डाण घेतील, जिथे पहिली फ्लाइट ३ नोव्हेंबर २०२३ ला उड्डाण घेणार आहे. फ्रँकफर्ट-हैदराबाद फ्लाइट आगामी हिवाळ्यामध्ये कार्यसंचालनांना सुरूवात करेल आणि या संयोजित फ्लाइट्स ग्रुपसाठी एशिया पॅसिफिकमध्ये पहिल्या नवीन मार्गांचे प्रतिनिधीत्व करतील.

या विस्तारीकरणामधून वाढत्या तरूण श्रमजीवी व्यावसायिकांच्या गरजांची पूर्तता करत भारतीय बाजारपेठेतील आपली उपस्थिती दृढ करण्याजप्रती लुफ्थांसाचा दीर्घकालीन दृष्टीकोन दिसून येतो. ब्रॅण्डचा विशेषत: कोविडनंतरच्या युगामध्ये ग्राहकांना बिझनेस असो किंवा लेजर असो त्यांच्या आंतरराष्ट्रीय ट्रीप्सदरम्यान सर्वात प्रिमिअम प्रवास अनुभव देत भारतातील न साधण्यात आलेल्या विकास संधींचा फायदा घेण्याचा मनसुबा आहे.

भारतात ५० हून अधिक साप्ताहिक सेवांसह लुफ्थांसा ग्रुपची भारतात जवळपास शतकापासून कार्यरत असण्याची परंपरा आहे आणि हे नवीन मार्ग उपखंडातील आघाडीचा युरोपियन एअरलाइन ग्रुप म्ह णून कंपनीची उपस्थिती अधिक दृढ करतील.