‘मानाचि’ संघटनेचा ६ मे २०२३ला ८ वा वर्धापनदिन

मुंबई : ‘मानाचि लेखक संघटना’ आपला ८ वा वर्धापन दिन शनिवार दिनांक ६ मे २०२३ ला सायंकाळी ६.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर) येथे साजरा करीत आहे. या कार्यक्रमात २०२२ सालात विविध माध्यमात प्रशंसनीय लेखन करणाऱ्या लेखकांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच नाटककार आणि पटकथाकार गंगाराम गवाणकर यांना ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ दिला जाणार आहे.

या समारंभाला वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे संपादक, पुस्तकांचे प्रकाशक, मालिका नाटक चित्रपटांचे निर्माते आणि दूरदर्शन वाहिन्यांचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

‘मानाचि लेखक संघटना’ मराठी भाषेतील मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या हौशी व व्यावसायिक लेखकांची संघटना असून २०१६ पासून रजिस्टर्ड कंपनी म्हणून सर्व माध्यमात लेखन करणाऱ्या कवी व लेखकांच्या उत्कर्ष व सन्मानासाठी कार्यशील आहे. १५० हून अधिक लेखक सभासद असलेली ‘मानाचि’ संघटना, परस्पर संवादातून लेखकांच्या समस्यांचे निराकरण करून, त्यांना यथोचित ‘मान’ आणि ‘धन’ ही मिळावे, यासाठी सदैव जागरूक आणि कार्यरत आहे.