एनएआर इंडियाने भारतातील रिअल इस्टेट उद्योगाचे भविष्य घडविण्यासाठी केली नवीन नेतृत्वाची नियुक्ती !

मुंबई : नॅशनल असोसिएशन ऑफ रियाल्टर्स (एनएआर) इंडियाला आगामी वर्षासाठी त्यांच्या नवीन लीडरशिप टीमची नियुक्ती जाहीर करताना आनंद होत आहे. नवीन लीडरशिप टीममध्ये अध्यक्ष रवि वर्मा, उपाध्यक्ष प्रवीण फणसे, अध्यक्ष शिवकुमार सीआर, अध्यक्ष-निवडक अमित चोप्रा, तत्कालिन माजी अध्यक्ष समीर अरोरा, महेश सोमाणी, दर्शन चावला आणि उपाध्यक्षपदी संतोष अवलक्की, मानद सचिवपदी अमित दामोदर, कोषाध्यक्षपदी आशिष मेहता, सहसचिवपदी विकास अग्रवाल, सहसचिव प्रशांत अग्निहोत्री यांची निवड करण्यात आली आहे.एनएआर-इंडिया स्पेशल ॲम्बेसेडर: विपुल शाह, महिला विंग- कीर्ती भोसले, नियामक मंडळ सदस्य वेंगटेश व्हीआर आणि नियामक मंडळ सदस्य आणि सीएसआर मेहुल विठलानी हे सर्व मिळून काम करतील.

नवीन लीडरशिप टीमने टियर २ आणि टियर ३ शहरांमधील गंभीर समस्यांचे निराकरण करून भारतातील रिअल इस्टेट उद्योगाचे भविष्य घडविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा दृष्टीकोन तयार केला आहे. या शहरांना आकार देण्यासाठी संघाने “सिटी शेपर्स” मंच सुरू केला आहे, ज्यामध्ये अभियंते, कॉर्पोरेशन, जनता, विद्यार्थी आणि निवडणूक आयोगाचे सदस्य यांचा समावेश आहे. या फोरमचे प्रमुख उद्दिष्ट ट्राफिक, शहरीकरण, प्रदूषण, सुरक्षित पाणी, महिला सुरक्षा, आरोग्य सेवा, ग्रामीण रोजगार अशा महत्वाच्या क्षेत्रात करण्याचा आहे. दरवर्षी दोन टियर ३ शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्याचे फोरमचे उद्दिष्ट असून ज्यामध्ये कोवई सिटी शेपर्स आधीच सुरू करण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त नवीन लीडरशिप टीमने ‘विलेज एडॉप्शन उपक्रमदेखील सुरू केला आहे, जेणेकरून ते भारतातील एक गाव दत्तक घेतील आणि आरोग्यसेवा, रोजगार, प्रवेश इत्यादी सुधारण्यासाठी कार्य करतील. या उपक्रमाचे नेतृत्व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे अध्यक्ष आणि एनएआर इंडियाचे स्पेशल ॲम्बेसेडर करणार आहेत.

नवीन टीमची “कॉलेज आउटरीच” उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रदान करण्याची तसेच त्यांना रियल्टर व्यावसायिकांचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्याची योजना देखील आहे.

एनएआर इंडियाचे ध्येय भविष्यातील नेत, नवीन लीडरशिप टीम भारतातील रिअल इस्टेट उद्योगातील व्यावसायिकता आणि नैतिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असून उद्योगात क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणे तसेच भारताच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.