ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची आर्थिक निकालांची घोषणा

मुंबई : भारतातील आघाडीच्या एकात्मिक पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदाता कंपनी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीसाठी आणि आर्थिक वर्षासाठी त्यांच्या आर्थिक निकालांची घोषणा केली.

स्वतंत्र कामगिरीमधील ठळक बाबी: कंपनीचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक १८.९६ टक्क्यांच्या वाढीसह ३,४९२ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२२ मधील ४२२ कोटी रूपयांच्या तुलनेत ४६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. तर करोत्तर नफा आर्थिक वर्ष २०२२ मधील २६७ कोटी रूपयांच्या तुलनेत १३.४९ टक्क्यांनी वाढून ३०४ कोटी रूपयांर्यंत पोहोचला.

एकत्रित कामगिरीमधील ठळक बाबी: कंपनीचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक १६.३६ टक्क्यांच्या वाढीसह ३,८१२ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २०२२ मधील ४५६ कोटी रूपयांच्या तुलनेत ४९५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. तर करोत्तर नफा आर्थिक वर्ष २०२२ मधील २९३ कोटी रूपयांच्या तुलनेत ९.४८ टक्क्यांनी वाढून ३२१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला.

टीसीआय ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विनीत अग्रवाल म्हणाले, ‘चौथ्या तिमाहीत आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आम्ही सर्व सेवा विभागांमध्ये चांगल्या गतीने पुढे गेलो आहोत. मोबिलिटी क्षेत्रातील वाढ, सतत सरकारी आणि खाजगी गुंतवणूक आणि स्थिर वापराचा ट्रेंड यामुळे आमच्या सर्व व्यवसायांना मदत झाली आहे. टीम टीसीआयने भारतात आणि शेजारच्या देशांमधील सोल्यूशन्स-आधारित कार्यान्वयनामुळे ग्राहकांसाठी मूल्य संपादित करणे सुरू ठेवले आहे. आमच्या रेल आणि कोस्टल मल्टीमॉडल सेवांमध्ये स्पष्ट ध्येय म्हणून जीएचजी उत्सर्जन बचतींसह वाढती मागणी पाहायला मिळाली. कंट्रोल टॉवर्स, यूएलआयपी एकीकरण आणि इतर विविध डिजिटल परिवर्तन उपक्रमांच्या अंमलबजावणीने आमच्या सेवा प्रस्तावांमध्ये वाढ केली आहे.’

आयआयएम बंगळुरूसोबत सहयोगाने नुकतेच टीसीआय-आयआयएमबी सप्लाय चेन सस्टेनेबिलिटी लॅबच्या लाँचसह स्थायीत्वाप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. लॅबचा कॉर्पोरेट्स आणि लॉजिस्टिक्स उद्योगाला त्यांच्या नेट-झीरो प्रवासात साह्य करण्याचा मनसुबा आहे.

अनेक देशांतर्गत आणि जागतिक घटकांमुळे आगामी तिमाहींवर अनेकानेक परिणाम होतील. पण, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमधील सातत्यपूर्ण गुंतवणूकांसह भारतातील गाथा स्थिर राहिल. विविध एफटीए आणि पीएलआय योजना निर्यात आणि उत्पादनाला चालना देत असल्यामुळे भारत जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये महत्त्वपूर्ण पाया बनेल आणि एलपीआय इंडेक्स रँकिंग्जमध्ये अधिक पुढे वाटचाल करेल. टीसीआय शिप्स, ट्रेन्स, कंटेनर्स आणि ग्रीन वेअरहाऊसिंगमध्ये आवश्यक गुंतवणूका करत आपली भूमिका बजावण्याशी कटिबद्ध आहे.