बोरिवलीत २८ आणि २९ मे २०२३ ला स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव !

मुंबई : बोरिवलीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेने उभारलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे २८ आणि २९ मे २०२३ ला साजरा करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या महोत्सव कार्यक्रमात भव्य प्रदर्शन, आणि गीत संगीतचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

रविवार २८ मेला संध्याकाळी ६.०० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड.आशिष शेलार, उत्तर मुंबई लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह सर्व आमदार आणि नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य चित्र प्रदर्शनाचे उद्घघाटन करण्यात येईल.

सोमवारी २९ मेला गुजराती डायरो प्रसिद्ध कलाकार सुनील सोनी, निलेश ठक्कर , निरुपमा रेगे, उदय गढवी,आशा प्रजापती यांच्या गायन वादनाचा कार्यक्रम संध्याकाळी ६.०० वाजता होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समिती आणि पोईसर जिमखाना यांच्या वतीने होणार आहे.