सोन्यात गुंतवणूकीचा कोणता पर्याय योग्य : फिजिकल की डिजिटल… – प्रथमेश माल्या

सोने ही भारतीय प्रत्यक्षरित्या खरेदी करणारी मालमत्ता आहे. पण कोविड-१९ नंतर डिजिटायझेशनच्या आगमनामुळे अनेक गुंतवणूकदारांनी डिजिटल मोडमध्ये त्यांची गुंतवणूक करणे निवडण्यासोबत पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या फिजिकल आणि डिजिटल पद्धतींबाबत माहिती देत आहेत एंजल वन लिमिटेडचे डीव्हीपी रिसर्च, नॉन-अ‍ॅग्रो कमोडिटीज अँड करन्सी प्रथमेश माल्या…

फिजिकल गोल्ड : गुंतवणूकदार निवड करू शकतील असा सर्वात सोपा मार्ग म्हणजे फिजिकल गोल्ड खरेदी करणे. गुंतवणूकदार प्रख्यात ज्वेलरकडून सोन्याचे दागिने किंवा कॉईन्स/बार्स खरेदी करू शकतात.

● प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याचे फायदे:

● गुंतवूणकदार सोने खरेदी करण्याला मौल्यवान मानत असल्यामुळे फिजिकल गोल्ड खरेदी करतात. ते घरी, स्टोरेज सुविधा किंवा बँक लॉकरमध्ये सोने स्टोअर करू शकतात, ज्यामधून त्यांना मन:शांती मिळते.
● गुंतवणूकदाराला उत्पन्न अहवाल, लाभांशामधील बदल आणि व्याज देयके यांबाबत चिंता करण्याची गरज भासत नाही.
लिक्वि‍डीटी: फिजिकल गोल्ड कुठेही संबंधित सुलभतेसह रोख रक्कबमेमध्ये बदलता येऊ शकते.
हॅक होऊ शकत नाही: तुम्हाला तुमच्याकडे सोन्याची नाणी किंवा दागिने ठेवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी किंवा वीजेची गरज लागत नाही. ते हॅक किंवा डिलीट करता येऊ शकत नाही.
वारसांसाठी आदर्श मालमत्ता: फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार सुलभपणे त्यांची मुले, नातवांकडे गुंतवणूक हस्तांतरित करू शकतात.
पैशांची बचत करण्याचा सोपा मार्ग: फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यासाठी पैसे बचत करण्यास मदत होऊ शकते, तसेच दीर्घकाळापर्यंत लक्षणीय परतावा मिळू शकतो.

फिजिकल गोल्ड खरेदी करण्याच्या मर्यादा पुढीलप्रमाणे:

● फिजिकल गोल्ड बँक लॉकर्समध्ये ठेवल्यास विशिष्ट टप्प्यासाठी स्टोरेज खर्च असतो.
● फिजिकल गोल्ड व्याज/लाभांश यांसारखे कोणतेही स्थिर उत्पन्न देत नाही.
● दागिने खरेदी करताना घडणावळचा खर्च येतो, तसेच काही अपव्यय देखील होते.

● सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा डिजिटल मोड:

● गोल्ड ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स) गुंतवणूक
● सार्वभौम सुवर्ण रोखे (सॉवरेन गोल्ड बाँड्स)ची खरेदी

गोल्ड ईटीएफमध्ये (एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स) गुंतवणूक:

निप्पॉन गोल्ड ईटीएफ, एसबीआय गोल्ड फंड, आदित्य बिर्ला सन लाइफ गोल्ड ईटीएफ, इन्व्हेस्को इंडिया गोल्ड ईटीएफ, एचडीएफसी गोल्ड ईटीएफ हे भारतातील अव्वल ५ गोल्ड ईटीएफ आहेत.

गोल्ड ईटीएफ कसे कार्य करते?

● एनएसई आणि बीएसईवर सूचीबीद्ध व व्यापार
● रोख विभागात व्यापार
● इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोन्याची खरेदी / रिडिम
● रिडिम करताना फिजिकल गोल्ड न मिळता समानुपाती रोख रक्कम मिळते.
● फिजिकल गोल्ड गुंतवणूकांच्या तुलनेत ईटीएफचा अत्यंत कमी खर्च आहे.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे :
● सोन्याच्या शुद्धतेची हमी दिली जाते
● प्रत्येक युनिटला उच्च शुद्धतेच्या फिजिकल गोल्डचे पाठबळ असते
● पारदर्शक व रिअल टाइम सोन्याच्या किमती
● स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध व व्यापार
● सोने ठेवण्याचा कर कार्यक्षम मार्ग, जेथे त्यामधून कमावलेले उत्पन्न दीर्घकालीन भांडवली नफा मानले जाते.
● संपत्ती कर नाही, सुरक्षा व्यवहार कर नाही, व्हॅट नाही आणि विक्री कर नाही.
● चोरीची भीती नाही – डीमॅटमध्ये असलेल्या युनिट्स म्हणून सुरक्षित आणि विश्वसनीय. सेफ डिपॉझिट लॉकर शुल्कांवर देखील बचत होते.
● ईटीएफ कर्जासाठी संपार्श्विक म्हणून स्वीकारले जातात.
● एण्ट्री आणि एक्झिट शुल्क नाही.

गोल्ड ईटीएफची कशी विक्री करावी/रिडिम करावे:

● स्टॉक एक्स्चेंजवर यांची विक्री करता येऊ शकते.
● डिमॅट आणि ट्रेडिंग खाते.
● लिक्विडेट झाल्यानंतर सोन्याच्या देशांतर्गत किमतीनुसार देय दिले जाते.
● गुंतवणूकदाराकडे ईटीएफमध्ये १ किग्रॅ किंवा विविध पटीत सोने असेल तर एएमसी प्रत्यक्ष स्वरूपात गोल्ड ईटीएफ युनिट्सच्या रिडम्श्् नला देखील परवानगी देते.
सार्वभौम सुवर्ण रोखे (सॉवरेन गोल्ड बॉड्स)ची खरेदी :
● सोन्यामध्ये डिजिटल गुंतवणूकीच्या मार्गांपैकी एक म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोखे (सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स). भारत सरकारच्या वतीने भारतीय रिव्हएर्स बँक हे रोखे जारी करते. हे रोखे १ ग्रॅमच्या मूळ युनिटसह सोन्याच्या ग्रॅमच्या पटीत दर्शवली जातात.
● रोखेची मुदत ८ वर्षांसाठी असेल, ज्यामध्ये ५व्या, ६व्या, ७व्या वर्षी बाहेर पडण्याचा पर्याय असेल, ज्याचा वापर व्याजाचे देय भरण्याच्या तारखांना केला जाईल. सरकारने वेळोवेळी निर्दिष्ट केल्याप्रमाणे प्रति आर्थिक वर्ष (एप्रिल ते मार्च) किमान मान्य मर्यादा १ ग्रॅम सोने असेल आणि अधिकतम मान्य मर्यादा व्यक्तीसाठी ४ किग्रॅ, एचयूएफसाठी ४ किग्रॅ आणि ट्रस्ट्स व तत्सम संस्थांसाठी २० किग्रॅ असेल.
● आयबीजेएने प्रकाशित केलेल्या मागील ३ कामकाजाच्या दिवसांच्या ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी अंतिम किंमतीवर आधारित रिडम्श्मागन किंमत भारतीय रूपयांमध्ये असेल. गुंतवणूकदारांना नाममात्र मूल्यावर अर्धवार्षिक देय वार्षिक २.५० टक्के दराने भरपाई दिली जाईल. आरबीआयने अधिसूचित केलेल्या तारखेला जारी केल्याच्या पंधरवड्याच्या आत रोखे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार करता येतील.
या पर्यायांपैकी गुंतवणूकदारांनी त्यांच्या गरजा आणि रिस्क प्रोफाइलनुसार गुंतवणूक करण्याची निवड केली पाहिजे. आमचा गुंतवणूकदारांना सल्ला आहे की, चांगल्या वैविध्यतेसाठी किमान १० टक्के पोर्टफोलिओ सोन्यामध्ये गुंतवा.

– प्रथमेश माल्या
डीव्हीपी रिसर्च, नॉन-अ‍ॅग्रो कमोडिटीज अँड करन्सी
एंजल वन लिमिटेड