दहिसरमध्ये खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते घर घर संपर्क अभियानाचा शुभारंभ

मुंबई:दहिसरमध्ये दिनांक ४ फेब्रुवारीला सकाळी आमदार मनिषा चौधरी यांच्या कार्यालयातून घर घर संपर्क अभियानाचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार गोपाळ शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना रोज तीन तास सकाळ संध्याकाळ असे फिरणे आणि लोकांपर्यंत मोदी सरकार तसेच राज्य सरकारची कामे आणि अहवाल पोचविण्याचे मार्गदर्शन केले.आमदार मनीषा चौधरी यांच्या वतीने खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मोती नगर गृहनिर्माण संस्थेत घर घर संपर्क अभियान राबविण्यात आले आणि प्रत्यक्ष शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, मंडळ अध्यक्ष अरविंद यादव, सर्व माजी नगरसेवक, प्रसिद्धी प्रमुख नीला सोनी राठोड, युवा मोर्चा अध्यक्ष अमर शाह आणि पदाधिकारी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर नीला बेन सोनी राठोड, आणि माजी नगरसेवक हरीश भाई छेडा यांनी वॉर्ड ८, बूथ १९२ येथे सदा सहायीनी इमारतीमध्ये घर घर अभियान अंतर्गत ३० घरांमध्ये संपर्क साधला.

यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रची एक संघटनात्मक पातळीवर आभासी बैठक प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍड.आशिष शेलार यांनी शनिवारी रात्री घेतली होती.उत्तर मुंबई भाजप सर्व नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने घर घर संपर्क अभियान अंतर्गत मैदानात उतरले आहेत, असे सांगत जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांनी सांगितले की आम्ही केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारची सर्व विकास कामे लिखित स्वरूपात पत्रक घेऊन मतदारापर्यंत पोचणार आहोत. यासाठी उत्तर मुंबई जोमाने कामाला लागला आहे.