गणेश उत्सवात नाटक तुमच्या घरात…

पुणे: प्रा. देवदत्त पाठक यांची गुफानची विदयार्थी कलाकार मंडळी करणार आहेत नाटक घराघरात. ३० विदयार्थी असलेल्या २ टीम ४ नवीन नाटकाचा आनंद घरातल्या गणपती समोर अगदी छोट्याशा जागेत सुध्दा प्रयोग रूपात देणार आहेत. लहानांची २ बालनाट्य आणि मोठ्यासाठीची २ युवानाट्य यामध्ये चक्क घरात अभिनय, संगीत आणि जुजबी साहित्य वापरून करण्यात येणार आहेत, या अनोख्या प्रयोगाचे संकल्पक प्रा. देवदत्त पाठक रंगभूमी कला, वाचवण्यासाठी हे प्रयोग करत आहेत.

१७ सप्टेंबरपासूनच सुरु झालेल्या नाटक घरात चाललय जोरात या नाट्य कला वाचवण्याचा आणि नाट्यरुची वाढवण्याच्या प्रयत्नात लेखक दिग्दर्शक देवदत्त पाठक, प्रमुख सहाय्यक मिलिंद केळकर आणि विद्यार्थी कलाकार साजिरी, सिध्दांत, अदिती नगरकर, आकांशा, सायली, अंजली चव्हाण, प्रथमेश, प्रांजल इंगळे, आर्या, आराध्या करपे, अक्षता, धनश्री गवस, ऋतुजा उत्तेकर, आलोक जोगदनकर, श्रेयस झपाटे, कुलदीप पाटील इ. अनेक विद्यार्थी सहभागी आहेत.१) देवारे देवा २) प्रिय आई बाबा ३) सध्या तो काय करतो ४) घाबरायच नाही,या आशय संपन्न नाटकातून नाटक जपणारही आणि नाट्यगृहात जाऊन आणि तिकीट काढून बघण्याची विनंतीही सर्व बाल आणि युवा विदयार्थी करणार आहेत.

हेमंत जेरे, सीमा जोगदेव, सुजाता टोकेकर, स्वप्निल गायकवाड, साखरे, जोशी,गवस, इ. अनेक कुटुबांमध्ये नाटकाचे प्रयोग गणेश उत्सवात घराघरात होणार आहेत. नाटक प्रेक्षागृहात करायला परवडत नसल्याने हा अनोखा परवडणारा आणि उदयोन्मुख कलाकारांना संधी देणारा हा नाट्य उपक्रम गणपती बाप्पाच्या कृपेने ऐच्छिक मानधन घेऊन हाऊस फुल्ल झाला आहे.