अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत साकारले पर्यावरणपूरक गणपती बाप्पा !

मुंबई : अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वत:च्या कल्पनेतून पर्यावरणपूरक गणपती बाप्पा साकारले. विद्यार्थ्यांना पर्यावरण जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या सण-उत्सवातून अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात होत असतो. गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आनंददायी व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीच्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. शाळेचे माजी विद्यार्थी वैभव पटवर्धन,आशिष म्हात्रे आणि प्रशांत नरवणकर यांनी श्री गणेश मूर्ती साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मुलांनी अतिशय सुबक आणि देखण्या मूर्ती बनविल्या रंगविल्या आणि स्वनिर्मितीचा आनंद घेतला.

या गणेश मूर्तीचे विसर्जन शाळेच्या आवारात कृत्रिम विहिरीत केलं जाणार आहे. विसर्जनानंतर तयार झालेली माती बाप्पाला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून बनविलेल्या सेंद्रिय खतात मिसळून विद्यार्थ्यांनीच बनवून जोपासलेल्या शाळेच्या परसबागेसाठी वापरण्यात येईल.