विद्यानिधी विद्यालयात ‘मराठी भाषा दिवस’ संपन्न !

मुंबई : जुहू येथील विद्यानिधी विद्यालयात ‘मराठी भाषा दिवस’ उत्साहात संपन्न झाला. शाळांमध्ये घेतले जाणारे उपक्रम हे नुसते उपक्रम नसून वेगवेगळ्या मूल्यांची संस्कारांची जोपासणूक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनवता खऱ्या अर्थाने संस्कारी घडवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम घेणे ही काळाची गरज आहे, हे या शाळेने ओळखले आहे.

मराठी भाषा गौरव दिनाला विद्यानिधी परिवारातील डबिंग-मिमिक्री आर्टिस्ट हितेश झगडे पाहुणे म्हणून लाभले. मराठी दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या मराठी कलाकारांच्या आवाजाचे हुबेहूब सादरीकरण झाले आणि विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. शाळेशी ऋणानुबंध जोडून असलेले माजी विद्यार्थी सुशील रक्ते याने माझी मराठी ग माय जशी दुधावरची साय आणि शाळेतील शाळांमध्ये घेतले जाणारे उपक्रम हे नुसते उपक्रम नसून वेगवेगळ्या मूल्यांची संस्कारांची जोपासणूक असते.

शिक्षकांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांची ‘अनामवीरा जिथे जाहला’ या कविता सादर केल्या. शालेय विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच शिक्षक आणि विद्यार्थी यांनी गटाने मराठी भाषेतील म्हणी,वाक्यप्रचार आणि साहित्यिक यांवर आधारित प्रश्नमंजुषेत सहभागी झाले. शाळेचे संगीत शिक्षक यांनी सुरेल बसविलेले महाराष्ट्र गीत राज्य गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आणि माय मराठीया सुमधुर गीतांच्या गायनाने झाला. विद्यार्थ्यांनी परिक्षार्थी न होता ज्ञानार्थी झाले पाहिजे, हाच संदेश मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.