विद्या विकास मंडळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीद्वारे साजरा केला ‘मराठी भाषा गौरव दिन’ !

मुंबई : मुंबईच्या अंधेरीतील विद्या विकास मंडळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीद्वारे उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर ग्रंथदिंडी दिमाखात शाळेच्या आवारात फिरवली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन जोशी यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधून मराठी भाषेची महती सांगितली. तसेच मुलांनी कार्यकमाचे खूप छान सादरीकरण केले. शाळेचे माजी शिक्षक कै. कांदळगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेतल्या गेलेल्या काव्यवाचन, अभिवाचन, वकृत्व आणि कथाकथन स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसं देऊन गौरविण्यात आले.