‘स्टार’,’लेखकाचा कुत्रा’,’मानलेली गर्लफ्रेंड’,’बारम’,आणि ‘उकळी’ला मिळाला पारंगत एकांकिका सन्मान.

मुंबई : एकांकिका क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘अस्तित्व’ आयोजित ‘पारंगत सन्मान-२०२३’ मध्ये स्टार(जिराफ थिएटर), लेखकाचा कुत्रा (मिलाप थिएटर, पुणे), मानलेली गर्लफ्रेंड (इंद्रधनू,मुंबई) या एकांकिकेने खुल्या गटात तर मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालयच्या ‘बारम’, कीर्ती महाविद्यालयाच्या ‘उकळी’ या एकांकिकांने आंतरमहाविद्यालयीन गटात पारंगत ठरण्याचा मान मिळवला. कलामंथन, ठाणेच्या ‘फ्लाईंग राणी’ या एकांकिकेला खुल्या गटात तर भवन्स महाविद्यालयाच्या ‘घरोटं’ या एकांकिकांना विशेष परीक्षक सन्मानाने गौरविण्यात आले.

वर्षभरातल्या एकांकिकांमधील सर्वोत्तमतेची पोचपावती देणारा ‘पारंगत सन्मान-२०२३’ पुरस्कार सोहळा २५ फेब्रुवारीला पु. ल. देशपांडे कला अकादमीत झाला. एकांकिका क्षेत्रातल्या सर्व नव्या दमाच्या रंगकर्मींना स्पर्धेशिवाय एकत्र आणून त्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचा खेळीमेळीच्या वातावरणात आढावा घ्यावा, या हेतूने ‘अस्तित्व’ या मुंबईतल्या प्रयोगशील नाट्यसंस्थेतर्फे गेली पाच वर्ष या पारंगत सन्मान संध्येचे आयोजन केले जाते. यंदा खुल्या आणि आंतरमहाविद्यालयीन दोन्ही गटात वर्षभर वेगवेगळ्या प्रयोगशील एकांकिका झाल्यामुळे पारंगत सन्मानासाठी विशेष चुरस दिसून आली. त्याचे प्रतिबिंब निकालातही पडलेले दिसले.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘अस्तित्व’तर्फे हा सोहळा मुंबई, ठाण्यातल्या विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सादर केला. या सोहळ्यात वर्षभर विविध स्पर्धामध्ये पारितोषिक विजेती ठरलेली प्रहसने,ठाण्याच्या मोरया इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट आणि दादरचे कीर्ती महाविद्यालयाने सादर केली. आयरिस प्रोडक्शन्सच्या विद्याधर पाठारे यांच्या हस्ते पारंगत एकांकिका पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी एकांकिका क्षेत्रातले आजी-माजी सर्वच रंगकर्मीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पारंगत सन्मान-२०२३’चा निकाल

एकांकिका कारकीर्द सन्मान – श्याम चव्हाण
सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन पारंगत सन्मान” (एकांकिका-“बारस“) – कलांश थिएटर्स

पारंगत एकांकिका (खुला गट)
•जिराफ थिएटर – “स्टार” : पारंगत एकांकिका
•मिलाप थिएटर, पुणे – “लेखकाचा कुत्रा” : पारंगत एकांकिका (समीक्षक पसंती पुरस्कार)
•इंद्रधनू, मुंबई – “मानलेली गर्लफ्रेंड” : पारंगत एकांकिका (समीक्षक पसंती पुरस्कार)
•कलामंथन, ठाणे – “फ्लाईंग राणी” : पारंगत एकांकिका (विशेष परीक्षक पुरस्कार)

पारंगत एकांकिका (महाविद्यालयीन गट)
•महर्षी दयानंद महाविद्यालय – “बारम” : पारंगत एकांकिका
•कीर्ती एम्. डुंगरसी महाविद्यालय – “उकळी” : पारंगत एकांकिका (समीक्षक पसंती पुरस्कार)
•भवन्स महाविद्यालय – “घरोटं” : पारंगत एकांकिका (विशेष परीक्षक पुरस्कार)
•गुरुनानक खालसा महाविद्यालय – “कोळसा” पारंगत एकांकिका (उत्कृष्टता सन्मानपत्र)

पारंगत दिग्दर्शक (खुला गट)
•राकेश जाधव (बॉबी) – “स्टार” : पारंगत दिग्दर्शक
•अनिकेत बोले/ प्रफुल्ल आचरेकर – “डोन्ट क्विट” : पारंगत दिग्दर्शक (समीक्षक पसंती पुरस्कार)
•नचिकेत दांडेकर – “टिनिटस” पारंगत दिग्दर्शक (विशेष परीक्षक पुरस्कार)
•विजय पाटील – “फ्लाईंग राणी” : पारंगत दिग्दर्शक (विशेष लक्षवेधी पुरस्कार)

पारंगत दिग्दर्शक (महाविद्यालयीन गट)
•यश पवार/ हृषीकेश मोहिते – “बारम” : पारंगत दिग्दर्शक
•प्रशांत केणी – “उकळी” : पारंगत दिग्दर्शक (समीक्षक पसंती पुरस्कार)
•अजय पाटील – “डोक्यात गेलंय” : पारंगत दिग्दर्शक (विशेष परीक्षक पुरस्कार)
•अमित पाटील – “कोळसा” : पारंगत दिग्दर्शक (उत्कृष्टता सन्मानपत्र)

पारंगत लेखक (खुला गट)
•सुनील हरिश्चंद्र – “मानलेली गर्लफ्रेंड” : पारंगत लेखक
•नचिकेत दांडेकर – “टीनिटस” : पारंगत लेखक (समीक्षक पसंती पुरस्कार)
•अनिकेत बोले – “डोन्ट क्विट” : पारंगत लेखक (विशेष परीक्षक पुरस्कार)
•मोहन बनसोडे -“फ्लाईंग राणी” : पारंगत लेखक (विशेष लक्षवेधी पुरस्कार)

पारंगत लेखक (महाविद्यालयीन गट)
•चैतन्य सरदेशपांडे – “उकळी” : पारंगत लेखक
•शुभम यादव – “बारम” : पारंगत लेखक (समीक्षक पसंती पुरस्कार)
•गायत्री उल्हास नाईक – “प्रवास” : पारंगत लेखक (विशेष परीक्षक पुरस्कार)
•अजय पाटील – “डोक्यात गेलंय” : पारंगत लेखक (विशेष लक्षवेधी पुरस्कार)

पारंगत अभिनेता (खुला गट)
•अनिल आव्हाड – “स्टार” : पारंगत अभिनेता
•प्रणव जोशी – “लेखकाचा कुत्रा” : पारंगत अभिनेता (समीक्षक पसंती पुरस्कार)
•महेश खापरे – “बारस” : पारंगत अभिनेता (विशेष परीक्षक पुरस्कार)
•निशित मोहिते – “शे.उ.वा” : पारंगत अभिनेता (विशेष लक्षवेधी पुरस्कार)

पारंगत अभिनेता (महाविद्यालयीन गट)
•देवेन कोळंबकर – “बारम” : पारंगत अभिनेता
•श्रेयस काटकर – “उकळी” : पारंगत अभिनेता (समीक्षक पसंती पुरस्कार)
•ओंकार परब – “काहीतरी अडकलंय” : पारंगत अभिनेता (विशेष परीक्षक पुरस्कार)
•संकेत मुंढे – “तुम्ही OR NOT TO ME” : पारंगत अभिनेता (उत्कृष्टता सन्मानपत्र)
•अजय पाटील – “डोक्यात गेलंय : पारंगत अभिनेता (उत्कृष्टता सन्मानपत्र)

पारंगत अभिनेत्री (खुला गट)
•निकिता घाग – “फ्लाईंग राणी” : पारंगत अभिनेत्री
•कोमल वंजारे – “हिलाऱ्या” : पारंगत अभिनेत्री (समीक्षक पसंती पुरस्कार)
•निहारिका राजदत्त – “मानलेली गर्लफ्रेंड” : पारंगत अभिनेत्री (विशेष परीक्षक पुरस्कार)
•विजया विश्वनाथ गुंडप – “आखाडा” : पारंगत अभिनेत्री (विशेष लक्षवेधी पुरस्कार)
•दर्शना पाटील – “यासनी मायनी यासले” : पारंगत अभिनेत्री (विशेष लक्षवेधी पुरस्कार)
•मनाली राजेश्री – “जीर्णोद्धार” : पारंगत अभिनेत्री (उत्कृष्टता सन्मानपत्र)

पारंगत अभिनेत्री (महाविद्यालयीन गट)
•इशिका शिशुपाल – “उकळी” : पारंगत अभिनेत्री
•निकिता झेपले – “बारम” : पारंगत अभिनेत्री (समीक्षक पसंती पुरस्कार)
•रश्मी सांगळे – “उकळी” : पारंगत अभिनेत्री (विशेष लक्षवेधी पुरस्कार)
•सानिका देवळेकर – “डोक्यात गेलंय” : पारंगत अभिनेत्री (उत्कृष्टता सन्मानपत्र)

पारंगत प्रकाशयोजनाकार
•सिद्धेश नांदलस्कर – “कोळसा” : पारंगत प्रकाशयोजनाकार
•राजेश शिंदे, आकाश पांचाळ – “टीनिटस” : पारंगत प्रकाशयोजनाकार (समीक्षक पसंती पुरस्कार)
•शीतल तळपदे – “अन्नपूर्णा हाज़िर हो” : पारंगत प्रकाशयोजनाकार (विशेष लक्षवेधी पुरस्कार)

पारंगत नेपथ्यकार
•दर्शन अबनावे, यश पवार – “बारम”: पारंगत नेपथ्यकार
•साहिल पवार – “कोळसा” : पारंगत नेपथ्यकार (समीक्षक पसंती पुरस्कार)
•समीर तोंडवळकर – “स्टार” पारंगत नेपथ्यकार (विशेष परीक्षक पुरस्कार)
•दीप्ती साळुंखे, विनायक परदेशी – “लेखकाचा कुत्रा” : पारंगत नेपथ्यकार (विशेष लक्षवेधी पुरस्कार)
•सुमीत पाटील – “अन्नपूर्णा हाज़िर हो” : पारंगत नेपथ्यकार (उत्कृष्टता सन्मानपत्र)

पारंगत संगीत
•रोहन पटेल – “स्टार” : पारंगत संगीत
•शुभम ढेकळे – “बारम” : पारंगत संगीत (समीक्षक पसंती पुरस्कार)
•अक्षय धांगट – “कोळसा” : पारंगत संगीत (विशेष परीक्षक पुरस्कार)