ठाणे वर्तकनगर येथील अशर मेट्रो गृहनिर्माण संस्थेचा पहिला गणेशोत्सव !

ठाणे: ठाणे येथील वर्तकनगरमधील अशर मेट्रो टावर्स सोसायटीच्या गणेशोत्सवाचे यंदा प्रथम वर्ष आहे. सोसायटीच्या सहकार्याने गणेशोत्सव समिती कम्युनिटी हॉलमध्ये ७ ते १२ सप्टेंबर असा सहा दिवसांचा गणेशोत्सव सोहळा साजरा करीत आहे.

सोसायटीतील तरुण मंडळींनी सोसायटीत कल्चरल व गणेशोत्सव समिती स्थापन केली असून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम राबवित आहेत. गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला. पाच दिवसांच्या या सोहळ्यात सकाळ,दुपार व संध्याकाळी आरती व रात्री हौशी तरुण मंडळी भजन व भावगीतांचा कार्यक्रम सादर करतात, त्याचबरोबर लहान मुलांसाठी विविध स्पर्धा व सोसायटीतील महिलांच्या भजनाचा व मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केले आहेत. श्री गणेशाची शाडूची सुबक मूर्ती व पर्यावरणपूरक सजावट खास वैशिष्ट्य ठरलं आहे. या सोहळ्यामुळे सोसायटीत भक्तीमय,आनंदी व मंगलमय वातावरण आहे.