मुंबई: डॉ .विजयकुमार देशमुख यांच्या “ना ते आपुले “या नाट्यलेखनाला पंढरपूर येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठ यांच्यातर्फे दिला जाणारा साहित्य सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे . आशिर्वाद पुरस्कार, मुंबई ,महामृत्युंजय पुरस्कार, आणि आता परिमल पुरस्कार असे लागोपाठ तीन पुरस्कार डॉ. देशमुख यांच्या ना ते आपुले या नाटकाला मिळाले आहेत. या नाटकातील स्त्रीच्या वेदनेचे सखोल प्रतिबिंब रेखाटन वाचकाला अंतर्मुख करते. या नाटकाचे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केले आहे.
पुरस्काराची ही हॅट्रिक डॉ विजयकुमार देशमुख यांच्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांसारखीच विक्रमी आहे. यापूर्वी सुद्धा त्यांच्या प्रकाशित साहित्याला राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .हा पुरस्कार सोहळा पंढरपूर येथे दिनांक १३ जून २०२६ रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.लवकरच या गाजलेल्या नाटकाचा पुण्याच्या डॉ. सुमेधा हर्षे हिंदीत अनुवाद प्रकाशित करत आहेत.